आभियांत्रिकीत अमर्याद संधी, मेहनत करा: नाठे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

नाशिक :  इतराच्या सल्यावर शाखा निवडण्यास बहुतांश विद्यार्थी व पालक प्राधान्य देतात. पण विद्यार्थी आपल्या आवडीचा विचार अभ्यासक्रम निवडतांना करत नाही. त्यामुळे आवडीचे क्षेत्र, शाखा निवडा, अभ्यास करायची, मेहनत घेण्याची तयारी असेल तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक शाखेत समान संधी आहेत, असे प्रतिपादन तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नाशिक विभागाचे सहसंचालक प्रा. डी. पी. नाठे यांनी गुरूवारी (ता.31) केले. 

नाशिक :  इतराच्या सल्यावर शाखा निवडण्यास बहुतांश विद्यार्थी व पालक प्राधान्य देतात. पण विद्यार्थी आपल्या आवडीचा विचार अभ्यासक्रम निवडतांना करत नाही. त्यामुळे आवडीचे क्षेत्र, शाखा निवडा, अभ्यास करायची, मेहनत घेण्याची तयारी असेल तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक शाखेत समान संधी आहेत, असे प्रतिपादन तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नाशिक विभागाचे सहसंचालक प्रा. डी. पी. नाठे यांनी गुरूवारी (ता.31) केले. 

   गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सकाळ व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ऍड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यातर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. "अभियांत्रिकी शिक्षणाच्या संधी' हा कार्यक्रमाचा विषय होता. या प्रसंगी "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार, संचालक भाऊसाहेब खातळे, ऍड. ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास होळकर, तंत्रशिक्षण संचालनालयाचे प्रा. व्ही. एच. चौधरी, व प्रा. एल. एस. पाटील उपस्थित होते. 

प्रा. नाठे म्हणाले, की विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे त्याच क्षेत्रात करिअर केल्यास त्यास नक्कीच यश मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रथम आपली आवड ओळखण्याची गरज आहे. अभियांत्रिकीच्या प्रत्येक शाखेत मोठी संधी आहेत. पण हे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरता अभ्यास न करता त्यापलिकडे जावून इंजिनिअर असल्याची भावना तयार करत स्वत:च्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज असते. 

दरम्यान यावेळी प्रा. व्ही. एच. चौधरी व प्रा. एल. एस. पाटील यांनी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांना सखोल माहिती देत ऑनलाईन अर्ज कसा भरावा, कोणत्या सूचनांचे पालन करावे, कशी काळजी घ्यावी, ऑनलाईन अर्ज भरताना अर्जाचे टप्पे, ऑप्शन फॉर्म, टाइप ए आणि बी, जागांचे आरक्षण, सुविधा केद्रांतून फॉर्म भरणे किती सुरक्षित आहे, एआरसी काय असते ते काम करते, आवश्‍यक कागदपत्रे यासह विविध विषयांची सखोल माहिती दिली. 

संधीची विद्यार्थ्यांना ओळख: पवार 
बारावीनंतर अभियांत्रिकीच्या आवडीच्या शाखेला प्रवेश कसा मिळविला पाहिजे, रोजगाराच्या संधी कशा आहेत, कुठले महाविद्यालय निवडायचे, प्रवेश प्रक्रियेत चालू वर्षी काय बदल झाले आहे. यासारख्या अनेक छोट छोट्‌या गोष्टींचे ज्ञान विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या उपक्रमातून होत असते. यातून विद्यार्थ्यांना उपलब्ध संधीची ओळख होत असते. त्यामुळे याचा लाभ विद्यार्थ्यांना उचलला पाहिजे असे मत मविप्र संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलिमाताई पवार यांनी व्यक्त केले. 

भविष्यातील दिशा लक्षात घ्या : माने 
भाजीपाल्याच्या बाबतीत मागणी तसा पुरवठा या तत्वाचा विचार होतो, पण शिक्षणात मात्र तसे होतांना दिसत नाही. त्यामूळे एकाच अभ्यासक्रमाला मोठ्या संख्येने प्रवेश घेतले जातात व कालांतराने उत्तीर्णांना रोजगारासाठी संघर्ष करावा लागतो. पालक व विद्यार्थ्यांनी पुढील दहा वर्षांतील बदलांचा अंदाज घेत, अभ्यासक्रमाची निवड करावी, असे आवाहन सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांनी केले. ते म्हणाले, की विद्यार्थ्यांनी पालकांशी मोकळेपणाने संवाद साधतांना नाविन्याचा शोध घ्यावा. पुढील काळ हा इनोव्हेशनचा असल्याने शिक्षणाचे मुळे हे इनाव्हेशन ठेवायला हवे. 

Web Title: marathi news enginering problem