एरंडोल पालिकेच्या खतास हरित ब्रॅण्ड 

एरंडोल पालिकेच्या खतास हरित ब्रॅण्ड 

एरंडोल : पालिकेच्यावतीने शहरातून पाच घंटागाड्यांच्या ओला व सुका कचरा संकलित करून त्याच्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खताची निर्मिती केली जात आहे. ओल्या कचऱ्यापासून निर्माण केलेल्या या खतास शासनाने हरित ब्रॅण्ड दर्जा बहाल केला आहे. 
पालिकेच्यावतीने घनकचरा कचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरातून दररोज पाच घंटागाड्यांद्वारे ओला व सुका कचरा संकलित केला जातो. पालिकेच्या पद्मालय रस्त्यावर असलेल्या घनकचरा प्रक्रिया केंद्रावर ओल्या कचऱ्यापासून खताची निर्मिती केली जाते. पालिकेने तयार केलेल्या खताची प्रयोगशाळेतून चाचणी करून त्याचा अहवाल शासनाकडे हरित ब्रॅण्ड प्राप्त करण्यासाठी सादर करण्यात आला होता. सदर खताची पडताळणी केल्यानंतर शासनाने पालिकेने तयार केलेल्या खतास हरित ब्रॅण्ड म्हणून दर्जा प्रदान केला आहे. नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले. पालिकेच्यावतीने तयार करण्यात येणारे खत उत्तम दर्जाचे असून सदरचे खत परिसरातील शेतकऱ्यांना अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खताचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी पालिकेच्यावतीने दररोज नियमितपणे शहरातून ओला व सुका कचरा संकलित केला जातो. त्यामुळे शहरातील घाणीची समस्या दूर झाली आहे. ओल्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेले खत सेंद्रिय पद्धतीचे आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीची हानी होत असून त्याचा पर्यावरणावर देखील परिणाम होत असतो. सेंद्रिय खतांच्या वापर करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने सदरचा उपक्रम असल्याचे सांगितले. या उपक्रमासाठी पालिकेचे सर्व नगरसेवक, पालिका कर्मचारी व नागरिकांचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com