"ईएसडीएस'मध्ये जीईएफ कॅपीटल पार्टनर्सतर्फे गुंतवणूक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

नाशिक : सातपूर येथील ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन प्रा. लि. या कंपनीत जीईएफ कॅपीटल पार्टनर्स यांनी गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. काल (ता.5) पर्यावन दिनाचे औचित्य साधतांना गुंतवणूकीची घोषणा केली आहे.

नाशिक : सातपूर येथील ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन प्रा. लि. या कंपनीत जीईएफ कॅपीटल पार्टनर्स यांनी गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. काल (ता.5) पर्यावन दिनाचे औचित्य साधतांना गुंतवणूकीची घोषणा केली आहे.

गुंतवणूकीतील रक्‍कमेतून कंपनीचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी मदत होणार आहे. टप्या-टप्याने गुंतवणूक केली जाणार असून पहिल्या टप्यात सुमारे शंभर कोटी रूपये गुंतविले जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. 
ग्लोबल इनव्हार्नमेंट फंडशी संलग्न असलेल्या जीईएफ कॅपीटल पार्टनर्सतर्फे गेल्या चार वर्षांपासून गुंतवणूकीच्या संदर्भात अभ्यास सुरू होता. कंपनीचा विस्तार व तंत्रज्ञानातील वेगळेपण लक्षात घेता गुंतवणूकीसाठी ईएसडीएस कंपनीची निवड केली आहे. पर्यावरण दिनी काल मुंबईत जीईएस कॅपीटल पार्टनर्सचे व्यवस्थापकीय संचालक राज पाई यांनी गुंतवणूकीची घोषणा केली.

ईएसडीएस कंपनीचे एनलाईट क्‍लाऊट या पेटंट प्राप्त तंत्रज्ञानाची आवश्‍यकता जगभरात आहे. व्हर्टीकल स्केलींगवर आधारीत या तंत्रज्ञानामुळे हार्डवेअरचा खर्च सत्तर टक्‍यांपर्यंत कमी होण्यास मदत होतांना वीजेचा वापरही कमी होत असल्याने कंपनीला भविष्यात विकासाच्या भरपुर संधी उपलब्ध असल्याचे मत राज पाई यांनी व्यक्‍त केले आहे. 

ग्रीन डेटा सेंटर पुरस्कार प्राप्त ईएसडीएस कंपनीला या गुंतवणूकीमुळे विस्ताराच्या संधी खुल्या होणार आहेत. सध्या कंपनीचा विस्तार देशभरासह युरोपीय देशांमध्येदेखील आहे. ई-कॉमर्ससह क्‍लाऊड तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या अन्य विविध क्षेत्रांना भविष्यात कंपनीच्या एनलाईट क्‍लाऊड टेक्‍नॉलॉजीचा फायदा होणार आहे. 

"एनलाईट' क्‍लाऊड प्लॅडफॉर्म हा रियल टाईम व्हर्टीकल ऑटोस्केलींग तंत्रज्ञानावर आधारीत असल्याने इतरांपेक्षा आम्हाला वेगळे बनवतो. कंपनीच्या सेवा विस्तारासाठी गुंतवणूक रक्‍कमेचा उपयोग होईल व कंपनीचा आणखी झपाट्याने व शाश्‍वत विकास होण्यास मदत होणार आहे. 
-पीयुष सोमाणी, 
व्यवस्थापकीय संचालक, ईएसडीएस

Web Title: marathi news Esds investment