अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या नाशिकमध्ये 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या नाशिकमध्ये 
नाशिक : भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थि आज नाशिकला आणल्या जाणार आहे. उद्या गुरुवारी (ता.23) दिवसभर 
नाशिकला भाजपच्या वसंतस्मृती या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवल्या जाणार आहे. 

दिवंगत पंतप्रधान वाजपेयी यांच्या अस्थी आज बुधवारी दुपारी चारला अस्थी कलश मुंबईत विमानतळावर आणण्यात येईल. त्यानंतर मुंबईत नरिमन पॉइंट येथे एनसीपीए सभागृहात सायंकाळी शोकसभा होईल. त्यात, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह नेते श्रध्दांजली वाहतील. मुंबईतील शोकसभेनंतर राज्यातील विविध नद्यांमध्ये अस्थींचे विसर्जन होईल. 

शुक्रवारी अस्थि विसर्जन 
मुंबई, नाशिक, पंढरपूर, पुणे, नागपूर,कोल्हापूर, अमरावती, नांदेड, मालेगाव, कराड, कर्जत, महाड व सांगली आदी भागातील नद्यांमध्ये अस्थी विसर्जन होणार आहे. 
शुक्रवारी (ता.24) सकाळी नउला पंचवटीत रामकुंडावर दिवंगत वाजपेयी यांच्या अस्थीचे विसर्जन होईल. तत्पूर्वी आज महापौर रंजना भानसी, भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी आज सकाळी मुंबईला वाजपेयींच्या अस्थि आणण्यासाठी नाशिकले गेले. सायंकाळी ते अस्थी घेउन नाशिकला येणार आहे. त्यानंतर गुरुवारी अंत्यदर्शन आणि शुक्रवारी अस्थि विसर्जन होणार आहे. अशी माहीती आमदार सानप यांनी दिली. 

Web Title: marathi news ex pm atalbhihari vajpai