जादा कामातून राज्य शासनाचा निषेध,महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नाशिकः महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. 9) महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने चौथ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले. त्यात शुक्रवारपासून सायंकाळी सहा ते सात असे रोज एक तास जादा काम करून राज्य शासनाचा निषेध नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्यात 11 जुलैपासून महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यानुसार शुक्रवारपासून आंदोलनाचा चौथा टप्पा सुरू झाला. राज्यभरातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयांत जादा काम आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जास्तीचे काम संपल्यानंतर सायंकाळी सातला जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयासमोर द्वारसभा घेऊन निदर्शने करून राज्य सरकारचा निषेध करणार आहेत. महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या तत्त्वतः मान्य करून पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही शासननिर्णय काढला जात नसल्याने राज्य महसूल कर्मचारी संघटनेने हे आंदोलन सुरू केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news extra work