विद्रोही शाहिर शंतनु कांबळे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

नाशिकः विद्रोही शाहिर शंतनु कांबळे​ (वय 40) यांचे आज ता. 13 रोजी दीर्घ आजाराने नाशिक येथे दुपारी 2 वाजता बिर्ला रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी दीपाली व मुलगा असा परिवार आहे. 
     

नाशिकः विद्रोही शाहिर शंतनु कांबळे​ (वय 40) यांचे आज ता. 13 रोजी दीर्घ आजाराने नाशिक येथे दुपारी 2 वाजता बिर्ला रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी दीपाली व मुलगा असा परिवार आहे. 
     

  शाहीर शंतनू कांबळे गेल्या काही वर्षांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त होते. तब्येत बिघडल्याने गेल्या आठवड्यात त्यांना नाशिकच्या बिर्ला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. आज प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. नव्या शाहीरांसाठी प्रेरणादायी असलेले शंतनू हे मुळचे सांगलीतील तासगावचे होते. मुंबईतल्या वडाळा येथे राह्यचे. मात्र आजारपणानंतर ते नाशिकला स्थायिक झाले होते. 
     

  2005 साली शंतनू यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नागपूर पोलिसांनी अटक केली होती. रायपूर येथे आदिवासींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले असता त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना 100 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र तपासाअंती कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. गेली अनेक वर्षांपासून विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि जातीअंताच्या लढाईत ते अग्रेसर होते. गाणी आणि कवितातून ते जातीय अत्याचार, शोषण, आर्थिक-सामाजिक विषमता आणि मानवतावादावर भाष्य करत असायचे. 'दलिता रे हल्ला बोल ना...श्रमिका रे हल्ला बोलं ना...' आणि 'समतेच्या वाटेनं, खणकावत पैंजण यावं तू यावं, तू यावं, तू यावं बंधन तोडीत यावं...' त्यांची आदी गीते चळवळीत लोकप्रिय होती. अत्यंत गाजलेला 'कोर्ट' हा सिनेमा त्यांच्या आयुष्यावर बेतलेला होता. ते 'विद्रोही' मासिकाच्या संपादक मंडळावरही होते. 
 

Web Title: marathi news famous poet kamble passaway