शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे अन्नत्याग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

नाशिकः जळगाव प्रमाणे नाशिकच्या उपसा जलसिंचन योजनातील शेतकऱ्याचे कर्जमाफ करावे. यासह प्रमुख मागण्यासाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सोमवारी दुपारी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे विविध पदाधिकारी सहभागी झाले. 

नाशिकः जळगाव प्रमाणे नाशिकच्या उपसा जलसिंचन योजनातील शेतकऱ्याचे कर्जमाफ करावे. यासह प्रमुख मागण्यासाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सोमवारी दुपारी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे विविध पदाधिकारी सहभागी झाले. 

जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री एकनाथ खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तेथील उपसा सिंचन योजनातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन घेतली. तसेच जळगावच्या बंद उपसा सिंचन योजना पुर्ववत सुरु करण्यासाठी 25 कोटी रुपये मंजूर करुन घेतले. पण नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सहकारी उपसा सिंचन योजनातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. सात बारा उताऱ्यावर बोजा मात्र लागला जातो. नाशिक जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनातील शेतकऱ्यांना कर्ज माफी योजनेतून उपसा सिंचन योजनातील शेतकऱ्यांना माफी देत नाशिकची उपेक्षा दूर करावी. आदी मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. ÷अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला. 
   चिलगव्हाण (जि.यवतमाळ) येथील साहेबराव कर्पे यांनी पत्नी मालती चार मुलांसह 19 मार्च 1986 ला पवनार जिल्ह्यातील दत्तपूर येथे सामूहीक आत्महत्या केली. त्या राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येला आज सोमवारी 19 मार्चला 32 वर्षे होत आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांचे प्रश्‍न कायम आहे. नाशिक जिल्ह्यात वर्षभरात 119 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्ती मिळावी.उपसा जलसिंचन योजनांचे कर्ज माफ करावे. यासाठी आज शेतकरी संघटनाच्या सुकाणू समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरुन अन्नत्याग आंदोलन केले. 
     शेतकरी संघटनाच्या सुकाणू समितीचे सदस्य राजू देसले, करण गायकर, गणेश कदम, भास्करराव शिंदे, धर्मराज शिंदे, नंदकुमार कर्डक, नामदेव बोराडे, शिवा तेलंग, विजय दराडे, बाळासाहेब गामणे, रघुनाथ आव्हाड, रावसाहेब हारक, भिमा उगले, संजय बैरागी, चेतन पणेर, सुभाष शेळके,आदीसह पदाधिकारी सहभागी झाले होते. 
 

Web Title: marathi news farmer agatation