उद्देश निश्चित करा...गटनिर्मिती होईलच,शेतकऱ्यांना मिळाला आत्मविश्वास

residentional photo
residentional photo


नाशिक: शेतकऱ्यांच्या सामूहिक विकासासाठी गट शेतीची संकल्पना पुढे आली आहे. या अनुषंगाने संघटीतपणे संस्थात्मक पातळीवर कामकाज होणे काळाची गरज आहे. यासाठी कौशल्य विकासातून गटशेतीला प्राधान्य दिल्यास शेतकऱ्यांचा सामूहिक विकास शक्‍य होईल. यासाठी उद्देश निश्‍चित करून शेतकऱ्यांनी गटांची निर्मिती करावी, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटी, आत्मा विभाग, सिमॅसिस लर्निंग एलएलपी आणि पॅलेडियम कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे आयोजित बैठकीप्रसंगी बुधवारी (ता.27) तज्ज्ञांनी संवाद साधला. यावेळी समस्या, शंकांचे निरसनही करण्यात आले. गटशेतीच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांची संस्थात्मक उभारणी व त्यातील समस्या जाणून घेण्यासाठी रामेती प्रशिक्षण सभागृहात बैठक झाली. 
शेतकऱ्यांच्या संघटनातून गट व त्यातून शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याच्या प्रक्रियेत असलेल्या शेतकरी प्रतिनिधी व कृषी संबंधित असलेल्या संस्थांचा सहभाग याबाबत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या बैठकीत झाली. 

सामुहिक चर्चा हवी

शेतकरी कुठला उद्देश घेऊन गटाची निर्मिती करतो, ते महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी गटांसाठी लागणारी यंत्रणा, त्याबाबतीत असणारी माहिती व सामूहिक पातळीवर आवश्‍यक अशी चर्चा करणे महत्वाचे आहे. यासाठी बदलत्या मार्केटिंग ट्रेंडमध्ये विपणन पद्धती विकसित करून सामूहिक विकास साधावा असे आवाहन केले. 

थेट लाभाकडे द्यावे लक्ष

 'शेतकरी ते ग्राहक' अशी साखळी निर्माण करून शेतकऱ्यांना थेट लाभ कसा मिळवून देता येऊ शकतो याबाबत आत्माचे प्रकल्प उपसंचालक कैलास शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले. हेमंत काळे यांनी पीकपद्धती व त्यानुसार शेतकरी गटांची निर्मिती याबाबत आवश्‍यक अशा बाबींवर लक्ष वेधले. यावेळी "सकाळ'चे वरीष्ठ व्यवस्थापक (एचआर) संजय पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक चव्हाणके यांनी केले. 

बैठकीत व्यापक चर्चा 
शेतकऱ्यांच्या समस्या, शेतमाल विक्री, भांडवलाची उपलब्धता, अर्थसहाय्य योजना, विपणन व ब्रॅंडिंग या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांकडून अडचणी जाणून घेतल्या. शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यासाठी असलेल्या तांत्रिक बाबी, त्यासंबंधित कामकाज व शासकीय पातळीवर अपेक्षित धोरणात्मक बदल याबद्दल शेतकऱ्यांची मते जाणून घेतली गेली. महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या कृषी कौशल्य विकास कार्यक्रमांद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या व विकासाच्या अपेक्षा याबाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांनी मागण्या बैठकीत मांडल्या.

मान्यवरांचे बहुमोल मार्गदर्शन
बैठकीसाठी रामेतीचे प्राचार्य संजय पाटील, आत्माचे प्रकल्प उपसंचालक कैलास शिरसाठ, हेमंत काळे, जिल्हा कृषीविकास अधिकारी रमेश शिंदे, पशुसंवर्धन उपयुक्त डॉ. संजय विसावे, महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीचे अधिकारी गजानन जगाते, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे लीड बॅंक ऑफिसर बी व्ही बर्वे, कृषी विज्ञान केंद्र नाशिकचे कार्यक्रम समन्वयक व वरिष्ठ शास्त्रज्ञ रावसाहेब पाटील, कृषी विज्ञान केंद्र मालेगांवचे कार्यक्रम समन्वयक अमित पाटील, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सादिक मनेरी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अविनाश गायकर, मविमचे कार्यक्रम अधिकारी युवराज उखाडे, महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रमाचे डेप्युटी टीम लीडर राकेश गांगुली, पॅलेडियमच्या प्रीतम शेरकर, पंकज बनकर यांची उपस्थिती होती. राकेश गांगुली यांनी प्रास्ताविक केले. तर जयप्रकाश कुलकर्णी यांनी विषयांचे सादरीकरण केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com