शेतकऱ्यांचे महामार्गावर रस्तारोको आंदोलन, शासनाच्या निषेधार्थ मुंडण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

मालेगाव : कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी (ता.1) सकाळी महामार्गावरील टेहरे फाट्यावर रास्तारोको व ठिय्या आंदोलन केले. कसमादे कृती समितीतर्फे आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. आंदाेलनात तालुक्यासह कसमादेतील तरुण शेतकरी स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले. कांद्याला हमीभाव मिळावा, दुष्काळी परिस्थितीत चारा, पाण्याची व्यवस्था करावी आदी मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी अर्धा तास महामार्ग रोखला. त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शासनाच्या निषेधार्थ काही शेतकऱ्यांनी मुंडन करुन कांदा रस्त्यावर फेकला. प्रांताधिकारी अजय मोरे यांना निवेदन दिले.

कांद्याचे भाव गेल्या पंधरा दिवसापासून कोसळल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. गेल्या वर्षासारखाच भाव मिळेल या अपेक्षेने राखून ठेवलेला उन्हाळी कांद्याला दोनशे ते तीनशे रुपये क्विंटल भाव मिळत अाहे. दुष्काळी परिस्थितीत कांद्यावरच विसंबुन असलेले शेतकरी कोसळेल्या भावाने हतबल झाले आहेत. कांद्याला समाधानकारक भाव मिळावा यासाठी तरुण शेतकऱ्यांनी शेतकरी कृती समिती स्थापन करत ‘लढा जगण्याचा’ या ध्येयाखाली एकत्र येत पक्षविरहीत आंदोलन केले. या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला.
टेहेरे फाट्यावर सकाळी साडेदहाला रास्तारोको आंदोलन झाले. तरुण शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. दुष्काळी परिस्थितीत खरीप व रब्बीचे पीक नाही. शेतकऱ्यांना जगण्यासाठी कांदा हे एकमेव साधन आहे. कांद्याचेच भाव कोसळल्याने कुटुंबाचा गाढा कसा हाकावा, दुष्काळात कसे जीवन जगावे? असे सवाल अनेकांनी केले. शासनाला शेतकऱ्यांचा भावनांशी काही घेणे-देणे नाही. शासन 

या तरुणांनी केले आंदोलन यशस्वी
कसमादेतील तरुण शेतकरी लढा जगण्याचा या ध्येयाखाली एकत्र आले. अवघ्या काही दिवसातच सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी पक्षवरहीत आंदोलन यशस्वी केले. ॲड. महेश पवार, जयेश अहिरे, गणेश बच्छाव, आकाश भामरे, अभिषेक पगार, अक्षय पवार, तेजस निकम, महेश पवार, रुपेश पवार, वैभव हिरे, दिगु गायकवाड, बच्चू पवार, योगेश सावंत, चंदू कन्नोर, पंकज शिरोळे, चंदू पगार, दिनेश सोनवणे, दिनेश अहिरे, मयुर अहिरे, गणेश अहिरे, मिलींद पवार, प्रणव अहिरे, तेजस हिरे, सुजय आहेर आदी तरुणांसह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनात कॉंग्रेस नेते डॉ. तुषार शेवाळे, शांताराम लाठर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते डॉ. जयंत पवार, राजेंद्र भाेसले, ॲड. आर. के. बच्छाव, अरुण देवरे, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, शेतकरी संघटनेचे शेखर पवार, प्रा. के. एन. अहिरे सहभागी झाले होते.

या आहेत मागण्या
* उन्हाळी कांद्याला पंधराशे रुपये तर पावसाळी कांद्याला अडीच हजार रुपये हमीभाव द्यावा.
* फळबागांसाठी हेक्टरी एक लाख तर इतर पिकांसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी.
* दुष्काळ मिटविण्यासाठी नार-पार-वांजुळपाणी याेजना तात्काळ मार्गी लावावी.
* शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक फी माफ करावी.
* चारा छावण्या न देता जनावरांची मोजणी करुन शेतकऱ्यांना थेट अनुदानाचा लाभ द्यावा.
* कांदा निर्यात प्रोत्साहन अनुदान पाच ऐवजी दहा टक्के द्यावे. 

Web Title: marathi news farmer andolan