धर्मा पाटील यांना अखेरचा निरोप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

धुळे - आपल्या कुटुंबाला वीजनिर्मिती प्रकल्पात शानाने अधिग्रहीत जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी अखेरच्या श्‍वासापर्यंत लढा देणाऱ्या धर्मा मंगा पाटील (वय ८०) यांच्यावर मंगळवारी सकाळी त्यांच्या विखरण या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह धुळ्यातील अनेक नागरिक उपस्थित होते. धर्मा पाटील यांना अखेरचा निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले. लढवय्या शेतकरी, असे उद्‌गार अनेक ग्रामस्थ धर्मा पाटील यांच्याबाबत काढत होते.  अंत्यसंस्कार करण्यापूर्वी एक शोकसभा घेण्यात आली. त्यात पर्यटनमंत्री जयकुमार रावल, माजी आमदार दिलीप सोनवणे आदी सहभागी झाले होते.

Web Title: marathi news farmer dharma patil