तरुण शेतकऱ्याचा फवारणीतून विषबाधा होऊन मृत्यू 

दीपक कच्छवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

मेहुणबारे ता. चाळीसगाव - वरखेडे येथील तरुण शेतकऱ्याचा चवळीच्या पिकाला फवारणी करतांना विषबाधा होऊन मृत्यु झाल्याची घटना घडली.

मेहुणबारे ता. चाळीसगाव - वरखेडे येथील तरुण शेतकऱ्याचा चवळीच्या पिकाला फवारणी करतांना विषबाधा होऊन मृत्यु झाल्याची घटना घडली.
मेहुणबारे-वरखेडे रस्त्यावर चौकीबर्डी येथे शेतातच वास्तव्यास असलेल्या अर्जुन श्रावण गवारे याचा लहान मुलगा संदिप गवारे (वय 28) हे शेतात चवळी पिकावर फवारणी करत होते. मात्र, फवारणी करुन घरी आल्यावर सायंकाळी सहाला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना उलटी झाली. घरी प्रथमोपचार केला. मात्र प्रकृती जास्तच खालावली होती. त्यांना उपचारासाठी मेहुणबारे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी संदीप यास मृत घोषित केले. संदिपचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. संदिपवर आज बारा वाजता वरखेडे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. संदिपच्या पश्चात पत्नी, आई-वडील, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु आहे.

Web Title: marathi news farmer died spraying pesticides