महाराष्ट्रात राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने ! 

residentional photo
residentional photo

नाशिक-अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. तेव्हा शेतकऱ्यांना पिकवार नुकसान भरपाई मिळायला हवी. अशी मागणी राज्यभरातील शेतकरी वर्ग करत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू केले होते. अशातच राज्यपालांकडून 16 नोव्हेंबर रोजी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिलासा दिला आहे अशा बातम्या येत आहेत. मात्र मदतीचे अल्प प्रमाण पहाता राज्यपालांनी शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत असे दिसून येते आहे. असे हनामान तज्ञ किरणकुमार जोहरे यांनी सांगितले

ते म्हणाले,अल्प मदत म्हणजे  शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. शेतकरी भिकेचा कटोरा घेवून उभा नाही. ही जाहीर केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच आहे अशा तीव्र प्रतिक्रिया शेतकर्यांनी व्यक्त केल्या आहेत. कोणतीही अट, निकष न लावता शेतकऱ्यांना सरसकट प्रती हेक्टरी किमान 50 हजार रुपयाची ताबडतोब मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.याशिवाय नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या मुलांचे परीक्षा शुल्क आणि शेतसारा माफ करण्याचा निर्णयही राज्यपालांनी घेण्यात आल्याचे जाहीर केले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्यानं शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीमध्ये वेळ लागण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. राज्यपालांनी तातडीने मदत वाटप करण्याचे आदेश राज्य प्रशासनाला दिले आहेत. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपाल कार्यभार सांभाळत आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांच्या निगराणीत शेतकऱ्यांपर्यंत ही मदत बॅंक खात्यात पोहोचवली जाणार आहे. असेही ते म्हणाले.

ते म्हणाले,राज्यातील 70 लाख पेक्षा जास्त संख्येने शेतकरी बाधित आहेत. एवढ्या लोकांना 10 हजार कोटींची मदत कशी पुरणार हा मोठा प्रश्न आहे. परतीच्या अतिरिक्त पावसाने महाराष्ट्रातील 90 लाख हेक्टर पेक्षाही जास्त जमिनीवरील पिके उध्वस्त झाली, ओला दुष्काळ पडला आहे. एकटय़ा नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 636 कोटी रुपयांचे शेतपिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. गेले काही दिवस पंचनामे करण्याचे काम सुरू होते. ते पूर्ण केल्यानंतर आता नुकसानीचे आकडे समोर आले आहेत. 1959 गाव या अवकाळी पावसामुळे बाधीत झाले असून, त्यात 6 लाख 47 हजार 315 हेक्टरवर नुकसान झाले आहे. यात बाधीत शेतकऱ्यांची संख्या 7 लाख 76 हजार 970 आहे.
      2014 सालच्या राज्यात 29 जिल्हातील झालेल्या गारपीटीमुळे नुकसानीपोटी दिलेल्या शासकीय मदतीची देखील अनेक शेतकर्यांना अद्याप प्रतिक्षा आहे. मात्र शेतकर्यांना मदत मिळण्यासाठी 2020 साल उजाडेल असे सांगितले जात होते. अशावेळी शेतकर्यांच्या काळजीचे ढोंग केले जात आहे अशी शंका आल्यावाचून रहात नाही. 


मदत वाढविण्याची प्रतिक्षा

ते म्हणाले,राज्यपालांनी केलेल्या घोषणेप्रमाणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नुकसान हे दोन हेक्टरपर्यंतच्या म्हणजेच अडीच एकर क्षेत्रावरील खरिप पिकांसाठी 8 हजारांची मदत देण्यात येणार आहे तर, फळबागांसाठी 18 हजारांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. फळबागा आणि बारमाही पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 18000 रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार असल्याचे राजभवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.  विशेष म्हणजे कमाल दोन हेक्‍टरपर्यंत मदत असणार आहे. हेक्टरी 8 हजार म्हणजे एकरी 3 हजार रुपयेच मदत मिळणार आहे. म्हणजे 75 रुपये प्रती गुंठा असे मदतीचे स्वरूप आहे. मिळण्यात येणाऱ्या मदतीतून द्राक्ष बागायतदार तसेच इतर शेतकरी एक फवारणीचा खर्च देखील वसूल करु शकत नाही. अजून रब्बीमध्ये (शेतात) पाणी भरलेले असल्याने अजून महिनाभर हरभऱ्याची पेरणी करता येणार नाही. या हंगामासाठी 8500 रूपये प्रति क्विंटल दराने खरेदी केलेले हरभरा बियाणेही पुढील वर्षीच्या हंगामापर्यंत ते चांगले राहणार नसल्याने येथील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. प्रती एकरी खराब झालेले सोयाबीन बाहेर काढायला 3500 रूपये व ज्वारीच्या पिकाला 5500 रूपये लागतात. त्यामुळे जास्त नुकसान झालेल्या शेतकर्यांना हा मोठा धक्का बसला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com