बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

अंबासन(नाशिक): द्याने (ता.बागलाण) येथील बोळाई शिवारात सुरेश दादाजी काडणीस  हे चुलत भाऊ लोटन यांच्यासह शेतात काम करतांना ऊसाच्या शेतात काहीतरी आवाज येत असल्याने सुरेश पहावयास गेले.. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढविल्याने ते गंभीर जखमी झाले. रूग्णालय उपचार सुरु आहे.

   या परिसरात चार ते पाच बिबट वावरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वनविभागाने लक्ष घालुन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे वनरक्षक एम.के. बोडके, अक्षय हेंबाडे, के.एम.आहिरे, वनमजूर रामदास खैरनार, कृष्णा ह्याळीज, राजेंद्र साळुंखे. संगिता मरशिवणे यांनी घटनास्थळी भेट दिली दिली असून वनविभागाने पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news farmer injured