बेपत्ता शेतकऱ्यांचा मृतदेह कालव्यात सापडला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

वणी  :  चिंचखेड ता. दिंडोरी येथील सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दत्तात्रय देवराम पाटील या शेतकऱ्याचा पालखेड डाव्या कालव्याच्या पाण्यात मिळून आला. वणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मृत पाटील यांच्यावर २५ लाखांचे कर्ज असल्याने सततची नापिकी व वाढत चाललेला कर्जाचा डोंगर यामूळे घराजवळ असलेल्या कालव्यात उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवल्याची माहीती कुटुंबीयांनी दिली आहे.

   कुटुंबीयांनी नातेवाईक व इतरत्र शोध घेत दत्तात्रय पाटील हे कोठेही मिळून    न आल्याने मंगळवारी येथील पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. तसेच सोशल मिडीयातूनही श्री. पाटील यांचा फोटो व माहीती देण्यात आली. सहा दिवसांपासून कुटुंबीय व नातेवाईक सर्वत्र शोधाशोध करत असतांना आज सकाळी अकराच्या सुमारास पालखेड डाव्या कालव्याच्या पाण्यात अज्ञात इसमाचा मृतदेह नागरिकांना दिसला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news farmer sucide in chinchkhad