अळीच्या प्रादुर्भावाने त्रस्त शेतकऱ्यांने मक्यात सोडल्या मेंढ्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

अंबासन, (जि.नाशिक) लष्करी अळीच्या प्रादूर्भावाने लागवड केलेल्या मका पिकांचे अतोनात नुकसान होत असून शेतकरी हतबल झाला आहे. ब-याचशा शेतक-यांनी सोनं गहाण ठेऊन तर काहींनी हातउसनवार करत  बियाणे तसेच शेतीची मशागत केली. मात्र अळीच्या प्रादूर्भावाने त्रस्त झालेल्या शेतक-याने मका पिक नको रे बाबा असे म्हणत पिकात मेंढ्या सोडल्या.
   
  खिरमाणी (ता.बागलाण) येथील शिवारातील शेतकरी विजय शिवाजी भदाणे यांनी शेजारच्या शेतक-याची साडेचार एकर शेती तोडबटाईने केली आहे. संपूर्ण क्षेत्रात मका पेरणी करण्यासाठी हातउसनवार केली होती. मात्र लष्करी अळीच्या प्रादूर्भावाने श्री. भदाणे त्रस्त झाले होते. त्यांनी पावडरीचा मारा करूनही अळीवर नियंत्रण मिळविता आले नाही. महागडे औषधे मारून उपयोग होईलच याची शाश्वती नसल्याने वैतागलेल्या शेतक-याने अखेर बुधवार (ता.२४) दुपारी संपूर्ण साडेचार एकर क्षेत्रावर मेंढ्या घातल्या व यावर्षी मका पिक नकोच असे म्हणत त्यांनी शेतीत मशागत करून बाजरी पेरणीचा निर्णय घेतला आहे. तालुक्यात ३५,६९२ मक्याचा पेरा आहे. आजतागायत १८,०८२ हेक्टर पेरा झाल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जाते. यात साधारण २,५१२ हेक्टरवर लष्करी अळीच्या प्रादूर्भाव झाला आहे. क्षेत्रात चार ते पाच टक्के कमी जास्त प्रमाणावर नुकसान झाले आहे. लष्करी अळी बाहेरुन आलेली पेस्ट असून त्याची जवळजवळ ऐंशी पिंकावर उपजीविका आहे. ऐंशी पिकांपैकी मका पिंकावर जास्त प्रमाणावर आढळून येत असल्याचे तालुका कृषी आधिकारी पवार यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news farmer in tension