पेरणीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

नरकोळ ः आर्द्रा नक्षत्रात पावसाला अद्याप जोर नसून, पेरणीसाठी सज्ज असलेला बळीराजा जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. सध्या पाऊस 15 ते 20 मिनिटे पडून उघडझाप करतो. हा पाऊस पेरणीयुक्त नसून, बागलाण तालुक्‍यातील नरकोळसह बंधारपाडा, जाखोड, मुंगसे, पिंगळवाडे भागात पावसाने पाठ फिरविली आहे. प्रचंड उकाडा जाणवत आहे. पाऊस नसल्याने पेरण्यांना विलंब होत आहे. पेरणीसाठी काहींनी मका, बाजरी बियाणे खरेदी केली आहे. मका पीक या भागात घेतले जाते. घरापुरते बाजरी पीक घेतात.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news farming