समीर भुजबळ,धनराज महालेंकडून अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

नाशिकः दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढती महागाई अशा विविध प्रश्‍नांप्रतीची संवेदना म्हणून कसल्याही प्रकारचा गाजावाजा, शक्तीप्रदर्शन न करता आज लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांनी नाशिक, तर धनराज महाले यांनी दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. समाजात अडचणीत असलेले घटक त्यांच्यासमवेत होते. 

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी महापौर अशोक मुर्तडक आणि उपाध्यक्ष राहूल ढिकले यांनी श्री. भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा हे चित्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले

Web Title: marathi news FILL APPLICATION