नाशिक ः महापालिकेच्या अग्निशमन विभागातील बहुतांश फायरमनने पन्नाशी ओलांडल्याने कामाला मर्यादा येत असल्याचे कारण देत अग्निशमन विभागाकडून 45 फायरमन आउटसोर्सिंगने भरण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा प्रस्ताव महासभेवर ठेवला जाणार आहे.
अग्निशमन विभागात फायरमनची स्थायी स्वरूपातील 151 पदे मंजूर आहेत. 2006 नंतर नव्याने रिक्त पदांची भरती झाली नाही. आतापर्यंत 54 फायरमन निवृत्त झाले आहेत. त्यामुळे इतर फायरमनवर कामाचा अतिरिक्त ताण येतो. 2006 नंतर शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली. सध्या सुमारे 18 लाखांपर्यंत लोकसंख्या आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार अग्निशमन यंत्रणादेखील तत्पर राखणे गरजेचे आहे. फायरमनच्या 54 रिक्त पदांमुळे कामकाजावर ताण निर्माण होतो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.