जळगाव-मुंबई प्रवासी विमानसेवेचा टेकऑफ

Mumbai Jalgao Flight Take-off
Mumbai Jalgao Flight Take-off

जळगाव : गेल्या 55 वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या विमानसेवेचा जळगाव विमानतळावरून आजपासून प्रवासी सेवेचा शुभारंभ झाला आहे. एअरडेक्कन कंपनीतर्फे पहिल्या प्रवासी विमानाच्या "टेकऑफ'ला राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी ढोलताश्‍याचा गजर करण्यात आला. "उडेगा आम आदमी' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमानुसार जळगावात सदर विमानसेवेस सुरूवात झाली आहे. जळगाव विमानतळावर दुपारी एक वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मुंबईहून तीन तास विमान उशिरा आल्याने कार्यक्रमासही विलंब झाला. 

एअरडेक्कनचे प्रवासी विमाने दुपारी तीन वाजून 47 मिनिटांनी जळगाव विमानतळावर उतरले. त्यावेळी त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विमानतळावर पाण्याचे फवारे उडवून अनोख्या पध्दतीने विमानाचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, एअरडेक्कनचे संचालक सी. डी. गोपीनाथ यांच्यासह विमानतळ कंपनीचे अधिकारी याच विमानातून उतरले. त्यांचेही जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल ताशे तसेच टाळ्या वाजविण्यात आल्या. 

यावेळी बोलतांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, की जळगाव-मुंबई विमानसेवा सुरू झाल्यामुळे येथील उद्योग व्यवसायास तसेच "मेडिकल हब'ला चालना मिळेल. आगामी काळात जळगावचा चांगला विकास होईल. एअरडेक्‍कन कंपनीचे संचालक सी. डी. गोपीनाथ म्हणाले, राज्यातील लहान गावे मोठ्या शहरास विमानसेवेने जोडल्यास खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल. ही सेवा आणखी विस्तारीत करण्यासाठी एअरडेक्कनचा प्रयत्न असेल. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी आभार व्यक्त केले. यावेळी राज्याचे सहकारराज्य मंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए. टी. पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते. यानंतर चार वाजून 47 मिनीटांनी विमानाने मुंबईकडे टेकऑफ केले. विमानसेवेच्या शुभारंभास जैन उद्योग समुहाचे अतुल जैन, तसेच शहरातील व्यापारी, उद्योजक तसेच नागरिक उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com