residentional photo
residentional photo

तब रहोंगे फिट ऍन्ड फाइन..! 

नाशिक ः आपली शरीरयष्टी पिळदार, व्यक्तिमत्त्व देखणे, रुबाबदार असावं, असं प्रत्येकांलाच वाटतं, तर युवती, महिलांही शरीरयष्टीबाबत सजग असल्याचे दिसते. नावाजलेल्या हेल्थ क्‍लब, जिममध्ये हजेरी लावून फिटनेसबाबत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याकडे सध्या कल वाढू लागला असून, त्यासाठी जादा पैसे मोजण्याचीही सर्वांची तयारी आहे. "नव्याचे नऊ दिवस नको' तर कायमस्वरूपी व्यायाम, कसरतीकरून सिक्‍स पॅक्‍स शरीरयष्टी बनविण्यासाठी घाम गाळण्याची तयारी प्रत्येकानेच ठेवायला हवी, असे वाटते तरच आपल्याला "फिट ऍन्ड फाइन' राहता येईल. 

बैठे काम, व्यायामाचा अभाव, अवेळी नाश्‍ता, भोजन आणि पुरेशी झोप नसणे या कारणांमुळे काही वर्षांपासून तरुण पिढीलाही मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारखे आजार जडले असून, डॉक्‍टरांकडे सध्या याच तरुणाईची संख्या वाढत आहे. डॉक्‍टरांशी चर्चा केली असता वर नमूद केलेली कारणेच आजार जडण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.

डॉक्‍टरांच्या सल्ल्यामुळे आता तरुणाई, महिला, पुरुष अशा सर्वांमध्येच व्यायाम, आहार-विहाराबाबत सजगता वाढू लागली आहे. अल्पकालावधीत चांगली शरीरयष्टी प्राप्त करण्यासाठी जिम, हेल्थ क्‍लबमधील व्यायाम केले जात आहे, त्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. जिम, हेल्थ क्‍लबला प्रवेश घेतल्यानंतर वजन, उंचीनुसार वेगवेगळे व्यायाम (फ्री हॅन्ड एक्‍सरसाईज) प्रशिक्षकाकडून करून घेतले जातात. त्यासाठी खास नियोजन (प्लॅनिंग) केले जाते आणि त्यांचे तंतोतंत पालन करण्यावरच सारे जण भर देतात. 

महिलांचा आकर्षक बांधा अन्‌ हार्मोन्सचा अडथळा 
युवती, महिला बारीक (स्लीम), झीरो फिगरसाठी आहारावर मर्यादा आणतात. युवती, महिलांमध्ये हार्मोन्सच्या बदलत्या प्रमाणावर बरेच काही अवलंबून असते. त्यांचे स्नायू पुरेशा प्रमाणात विकसित होत नसल्याने पाहिजे तशी आकर्षक शरीरयष्टी तयार होण्यास त्यांना अडचण येत नाही, याविरुद्ध पुरूषांमध्ये हार्मोन्सचे प्रमाण जास्त असल्याने स्नायू अधिक बळकट होऊन पिळदार शरीरयष्टी तयार होते आणि व्यक्तिमत्त्व रुबाबदार होण्यास मदत होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

तासिकेप्रमाणे वैयक्तिक प्रशिक्षक नेमण्यावर भर 
गेल्या काही वर्षांपासून हेल्थ क्‍लब, जिमशिवाय आपला स्वतंत्र प्रशिक्षक (ट्रेनर) असावा, अशी तरुणाई तसेच कुटुंबाची मानसिकता बनली आहे. त्यामुळे हेल्थ क्‍लब, जिमशिवाय आपल्या घरी बोलावून तास-दीड तासाचे प्रशिक्षण प्रशिक्षकांद्वारे घेतले जात आहे. त्यासाठी दरमहा तीन-चार हजारांएवढी रक्कमही मोजली जाते. त्यामुळे काही वर्षांपासून प्रशिक्षकांना एकप्रकारे चांगला रोजगार उपलब्ध होऊन बक्कळ कमाई होऊ लागली आहे. 

वाढत्या आजारांमुळे लोक अधिक जागरूक झाले असून, आपल्या व्यायाम, आहाराबाबत काळजी घेऊ लागले आहेत, ही चांगली बाब आहे. दैनंदिन जीवनात आळस झटकून प्रत्येकाने ठराविक वेळ हा व्यायाम, कसरतीसाठी दिलाच पाहिजे. त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. गोल्ड जिम, वर्ल्ड जिमसारख्या नावाजलेल्या क्‍लबची साखळी भारतात आली असून, त्याद्वारे सर्व प्रकारचे मार्गदर्शन उपलब्ध होऊ लागले आहे. जिम, फिटनेस क्‍लब हे सेवाक्षेत्र बनले आहे. लोकांच्या आरोग्याची काळजी वाहून सर्वांना तंदुरुस्त, सुदृढ ठेवण्यावर भर दिला जात आहे. लोकांनीही या प्रक्रियेत अधिकाधिक सहभाग द्यायलाच हवा, असे वाटते. 
राजेंद्र सातपूरकर, ज्येष्ठ व्यायाम प्रशिक्षक 
 

सुरवात करताय इकडे द्या लक्ष... 
-कार्डिओ एक्‍सरसाइज- सायकलिंग, वॉकिंग, ट्रेड मिल टेस्ट (टीएमटी) 
-वेट ट्रेनिंग- बेंच ब्रेस, स्कॉटिंग (थाईससाठी), डेड लिफ्ट, पुलींच्या सहाय्याने बॅक एक्‍सरसाइज 
-डंबेल्स- पिळदार यष्टी, दंडासाठी (बायसेफ, ट्रायसेफ) तसेच शोल्डरच्या इतर व्यायामांना प्राधान्य 
-आहाराचे नियोजन- आपल्या वजन, उंचीनुसार हेल्थ क्‍लबमध्ये स्वतंत्रपणे आहारांचे नियोजन करून दिले जाते 
-निश्‍चित आहारानुसार कमी-जास्त कॅलरीज, कॉर्बोहायड्रेडचे प्रमाण तसेच फळांचा ज्यूस, मासांहारचा वापर वाढवला जातो. 
-हिवाळ्यापासूनच व्यायाम, कसरतींसाठी खरा मुहूर्त 


-व्यायाम, फिटनेससाठी तीन, सहा, नऊ अथवा वर्षांचा कालावधी 
-हेल्थ क्‍लबमध्ये दर्जानुसार दरमहा कमीत कमी पाचशे ते 1500 रुपयांपर्यंत फी आकारणी 
-वार्षिक वर्गणी ही सात ते बारा-पंधरा हजारांपर्यंत 
-50 हून अधिक अधिकृत प्रमाणपत्रधारक प्रशिक्षक 
-महिलांसाठी प्रशिक्षण देणाऱ्यांची संख्या 35 च्या घरात 

---------- 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com