शेतकऱ्यांचा उद्यापासून देशव्यापी संप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

जळगाव ः शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतमालाला दीडपट भाव द्यावा, वीजबिल माफ करावे, दुधाला पन्नास रुपये दर मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी एक जूनपासून देशव्यापी संपावर जाणार आहेत. त्याची तयारी शेतकरी संघटनांनी जोमात सुरू केली आहे. ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या संपाबाबत बैठका होत आहेत. 

जळगाव ः शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतमालाला दीडपट भाव द्यावा, वीजबिल माफ करावे, दुधाला पन्नास रुपये दर मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी एक जूनपासून देशव्यापी संपावर जाणार आहेत. त्याची तयारी शेतकरी संघटनांनी जोमात सुरू केली आहे. ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या संपाबाबत बैठका होत आहेत. 

संपात 119 संघटना सहभागी होत आहेत. देशातील 928 शहरांत दूध, भाजीपाला, शेतीपूरक वस्तूंची बाजार समितीत विक्री करणार नाही. महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, मुंबई व नाशिक या मुख्य शहरांचा त्यात सहभाग आहे. शासनाने दिलेली कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. संपूर्ण कर्जमाफी मिळण्यासाठी हे आंदोलन असल्याची माहिती सुकाणू समितीचे सदस्य एस. बी. पाटील यांनी दिली. 
 
चार मेट्रो सिटींत भाजीपाला, दूध बंद 
शेतकऱ्यांचा संप देशव्यापी आहे. शेतमालास हमीभाव व संपूर्ण कर्जमुक्ती व शेतकरीविरोधी कायदे बदल या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील मागण्यांसाठी हा संप आहे. देशात शहरांचा शेतमाल पुरवठा थांबणार आहे. त्यात महाराष्ट्रात फक्त नागपूर, पुणे, नाशिक व मुंबई या शहरांचा दूध,भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा 1 ते 10 जून या कालावधीत बंद केला जाईल. 
 
शेतकऱ्यांनी स्वतः भाजीपाला विकावा 
इतर भागांतील शेतकऱ्यांनी शक्‍य तेवढ्या प्रमाणात दूध, भाजीपाला, अन्नधान्य या काळात विक्रीस नेऊ नये. आपला निषेध नोंदवावा. ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असेल व शेतमाल खराब होणार असेल, त्यांनी स्वतः आपला माल विकण्यास हरकत नाही. थोडक्‍यात, कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान करून संप करावयाचा नाही. दूध न विकल्यास आपल्या भागातील भालदेव सणाच्या वेळेस करतो तसे तूप करून विका म्हणजे नुकसान टळेल. दुधाला भाव ही प्रमुख मागणी आहे. 
 
आंदोलनातील टप्पे असे ः 
1 जून ः देशव्यापी आंदोलन सुरू 
5 जून ः धिक्कार दिवस 
6 जून ः मध्य प्रदेशातील मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली 
8 जून ः असहकार आंदोलन 
9 जून ः सामुदायिक उपोषण 
10 जून ः भारत बंद 

Web Title: marathi news former strike