करंजाडला लाडंग्याच्या हल्ल्यात शेळी, दोन करडू ठार 

live
live

जायखेडा, (जि.नाशिक) बागलाण तालुक्यातील करंजाड येथील संजय बापुराव देवरे यांच्या शेतात लाडग्याने शेळी व दोन करडूंवर हल्ला चढवून ठार केल्याची घटना सकाळी घडली. पोलिस पाटिल प्रवीण देवरे यांनी ताहाराबाद वनपरिक्षेत्रात माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
  संजय देवरे यांचे करंजाड येथील चिंचबारी शिवारातील गट क्रमांक ९७/२ मधील शेतात शेळी व तिचे दोन करडू सकाळी सुमारास चरत असतांना लाडग्याने अचानक हल्ला चढविल्याने शेळीने हंबरडा फोडला. यावेळी शेळीचे ओरडणे ऐकून श्री.देवरे हे शोध घेण्यासाठी आले असता त्यांना लांडगा शेळी ठार करून करडूवर हल्ला चढवत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आजूबाजूच्या शेतक-यांना आरडाओरडा करत असतांना लाडंग्याने जंगलात धूम ठोकली.. गावातील सामाजिक कार्यकर्ते केवळ देवरे व पोलिस पाटिल प्रवीण देवरे यांना माहिती मिळताच शेतात दाखल झाले. पोलिस पाटिल देवरे यांनी ताहाराबाद वनपरिक्षेत्रात माहिती दिली असता. संबधित वनविभागाच्या कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. एकीकडे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतांना हिंस्र प्राणी शेतक-यांच्या पाळीव जनावरांना फडशा पाडत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या परिसरात बिबट्या व लाडंग्याचा धुमाकूळ वाढतच चालला असून या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतक-यानी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com