मालेगावच्या "जय-विरू"; मोरे-दुसानेंच्या अखंड मैत्रीची चाळीशी

residentional photo
residentional photo

मालेगाव कॅम्प : जीवनात मित्रत्वाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कृष्ण- सुदामा असो की नावाजलेल्या ‘शोले’ चित्रपटातील जय - विरू ची मैत्री. मात्र वास्तव जगात दिल दोस्ती दुनियादारी आजही महत्त्वाची आहे. तब्बल 43 वर्षांपासून अखंड मैत्री जोपासत नवा विक्रमच मालेगावातील रमेश मोरे व शाम दुसाने या जोडगोळीने केला आहे. एकाच भागात राहणाऱ्या दोन मित्रांचे मैत्रीचे धागे 1976 मध्ये जुळले अन्‌ ते दिवसेंदिवस घट्ट होत गेले.

    कापड व्यवसायाच्या निमित्ताने निलकमल साडी सेंटरचे शाम दुसाने व पॉवरलूम व डाईंग उद्योजक रमेश मोरे हे नातं घट्ट झाले. कधी राम-शाम तर राम-लक्ष्मण, लव-कुश कधी 'जय-विरू' या नावाने शहर परिसरातच नव्हे तर नातेवाईक व हितचिंतकांना परिचित

 अवघ्या सहा महिन्यांच्या अंतराने दोघांचे विवाह झाला. गावचा जावाई हा जिव्हाळा कौटुंबिक झाला. मैत्रीत भावजीच नातं असल्याने दोघं कुटूंबाचा परस्परांवर दृढ विश्वास वाढला. एक दिवस नाही की स्नेहभाव वृद्धिंगत झाला नाही.सुख -दुख बसणं, उठणं, फिरणं, कपडे, ट्रीप सगळंच दिलखुलास. दोघांचं पहिलं अपत्य मुलगा, दुःखानेही पाठ सोडली नाही. दोघांच्या मुलांचं निधन झाले. एकमेकांस आधार देत ते सावरले. यानंतर दोन्ही दोस्तांना मुली झाल्या. आनंदही सारखाच पण कधीही वेगळेपण जाणवले नाही.

     प्रवास, पर्यटनाची विलक्षण आवड असल्याने 12 वेळा बालाजी दर्शन, जम्मु काश्मिर, कुलू मनाली, वैष्णोदेवी असा प्रवास कधी दोघं तर कधी कुटुंबासह. चार वेळा परदेश भ्रमंतीचा आनंद घेतला. मैत्रीच्या उत्सवात पैसा गौण संबंध, सुख दुःख, जिव्हाळा जपायला प्राधान्य. अगदी सायकल, लुनाच काय तर जून्या राजदूत एकाच वेळी दोन घेत. आजकाल छोट्या-मोठ्या गोष्टींवरून कुरबुरी होत असतांनाच कपडे, विविध वस्तू खरेदी एकाने केली तरी आनंद. 1992 ला दोघांच्या जीवनात टर्निंग पॉइंट शाम दुसाने यांना सुझूकीची डिलरशिप तर रमेश मोरे यांच्या वकिलीला सुरवात. मात्र व्यवसाय व व्यवहार कधीच मैत्रीच्या आड येऊ दिला नाही.'सख्खा भाऊ पक्का वैरी' च्या काळात बाहेरगावी जाताना एकमेकांना सांगून जातात.दिवसांतुन एकदा सायंकाळी भेटणं हा नित्यक्रम आहे. हाच धागा दोघं कुटुंब जोपासत आहेत. मुलांना या मैत्रीचा खूप अभिमान वाटतो. कुठल्याही वादाशिवाय 1976 पासुनचा हा प्रवास अव्याहत सुरू आहे. दोघंही भेटल्यावर अहिराणी भाषेत बोलतात. चित्रपट पाहणे, निखळ हसणे, विनोदी शैली संवाद, समुहात मिसळणे हा स्वभाव आहे.

 ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे' असं म्हणतं साठीनंतरही दोन बुलेट घेऊन बुलेटराजा होत रपेट मारणारी ही जोडी सदाबहार आहे. या मैत्रीचा तिसरा धागा नाशिकचा अरुण आघारकर असल्याचे आठवणीने ते सांगतात. मैत्री बिघडेल असे शब्द कुटुंबात व संवादात नाही. माणूसच माणसापासून दूरावणा-या तंत्रज्ञानाच्या काळात हा 'दोस्ताना' आदर्शवत आहे. मालेगावच्या जय विरु यांच्या मैत्रीची वाटचाल विक्रमी वर्षांची होवो.

हा जन्म पुन्हा नाही, जीव लावा जीव जोपासा. मैत्री निभवतांना सहनशीलता महत्त्वाची आहे. जीवनात निखळ आनंद फक्त या नात्यात मिळतो.
...शाम दुसाने

सुख-दु:खाच्या धाग्यांना विनतांना मैत्री ही खरे ठिगळ आहे. ती शब्द, संवाद, नातं, जिव्हाळा, प्रेम व माणुसकी निर्माण करते. तंत्रज्ञानाच्या सोशल जगात हा चिरतरुण आनंद मैत्रीच्या पर्वास ऊर्जादायी आहे.
- ॲडव्होकेट रमेश मोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com