जिल्हा समित्यांच्या वाढीव निधीला अर्थ विभागाची मान्यता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

जिल्हा समित्यांच्या वाढीव 550 
कोटीला अर्थ विभागाची मान्यता 

जिल्हा समित्यांच्या वाढीव 550 
कोटीला अर्थ विभागाची मान्यता 

नाशिकः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत, नियोजन आराखड्याशिवाय जिल्हा समित्यांनी मांडलेल्या प्राधान्यक्रमाच्या विषयांच्या वाढीव मागण्यांना अर्थमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली. 
सर्वाधिक 220.50 कोटी जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले. त्यात, तेथील लोकप्रतिनिधीशिवाय नाशिकच्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावला वाढीव निधी मिळावा,यासाठी बैठकीत, आग्रह धरला होता. त्यानंतर धुळे व नगर जिल्ह्याला अनुक्रमे 135.22 कोटी आणि नगरला 100 कोटीची वाढीव मागणीला वित्तमंत्रालयाने 
मान्यता दिली. 
नाशिक जिल्ह्यासाठी 55 कोटी वाढीव रकमेला मान्यता देण्यात आली. नाशिक रोडला सोमवारी (ता.12) विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्याच्या आढावा बैठकीत जिल्हा समित्यांच्या आराखड्याशिवाय वाढीव रकमेसाठी अर्थमंत्र्याकडे पाठपुरावा झाला. नाशिकला जि.प. इमारतीसाठी 
50 कोटीची मागणी झाली. मात्र त्याबाबत पालकमंत्र्यांनीच खो घातल्याने नाशिकला नंदुरबार जिल्हाप्रमाणे अवघी 50 कोटीची वाढीव रक्कम पदरात पडली. 

वाढील मान्यता (आकडे कोटीत) 
जळगाव ः - 220.50 
धुळे - 135.22 
नगर - 100 
नाशिक - 55.71 
नंदुरबार - 49.83 

Web Title: marathi news fund