फनिक्‍युलर ट्रॉलीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी जय्यत तयारी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

वणीः सप्तशृंगगडावरील फनिक्‍युलर ट्रॉलीचा 17 मार्चला होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. तब्बल नऊ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर फनिक्‍युलर ट्रॉलीचा 
देशातील पहिला प्रकल्प पूर्णत्वास येत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

वणीः सप्तशृंगगडावरील फनिक्‍युलर ट्रॉलीचा 17 मार्चला होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. तब्बल नऊ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर फनिक्‍युलर ट्रॉलीचा 
देशातील पहिला प्रकल्प पूर्णत्वास येत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 
 ज्येष्ठ, दिव्यांग, आजारी, गरोदर महिला, लहान मुलांना आदिमायेचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या सुमारे पाचशे पन्नास पायऱ्या चढणे त्रासदायक ठरत असल्याने तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी युक्रेनप्रमाणेच देशातील पहिला फ्युनिक्‍युलर ट्रॉलीच्या प्रकल्पाचे 15 ऑगस्ट 2009 ला भूमिपूजन करून कामाचा प्रारंभ केला होता. सुरवातीला वेगाने सुरू झालेल्या ट्रॉलीचे काम चार वर्षांपासून तांत्रिक, तसेच या-ना-त्या कारणाने रेंगाळले होते. अखेर प्रकल्प पूर्णत्वास येऊन शनिवारी सकाळी साडेदहाला ट्रॉलीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. 

मुख्यमंत्री दौऱ्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करणार असल्याने त्यासाठी तयारी, पोलिस बंदोबस्त ठेवण्याचा आदेश पोलिस अधीक्षक कार्यालय, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांना देण्यात आला आहे. कळवण येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक बोलावण्यात येऊन मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य दौऱ्याबाबत त्या त्या विभागाने केलेल्या व करावयाच्या तयारीबाबत आढावा घेण्यात आला. नांदुरी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने हेलिपॅड बनविण्याचे काम सुरू केले असून, नांदुरी ते सप्तशृंगगड घाटरस्त्याची डागडुजी, कठड्यांना रंगरगोटी, साइडपट्ट्यांच्या साफसफाईचे कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. गडावर ग्रामपंचायत, तसेच सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने प्लॅस्टिकबंदी व ग्रामस्वच्छतेच्या दृष्टीने वेगाने कामे सुरू करण्यात आली. 
 

Web Title: Marathi news funicular troll