गांधीजीच्या जीवनावरील दिडशे रूपयांच्या तिकीटांचा संग्रह प्रकाशित

युनूस शेख
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

जुने नाशिक  महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधत टपाल विभागाकडून त्यांच्या जीवन प्रवासातील विविध संदेश देणारे सात टपाल टिकीटाचे अनावरण करण्यात आले. बुधवार (ता.3) पासून सर्व टपाल विभागात त्याची विक्री सुरु करण्यात आली. विशेष म्हणजे प्रत्येक टिकीटावर त्याचा वेगळा संदेश आणि सही आहे. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची यंदा 150 वी जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली. टपाल विभागाने औचित्य साधत सात नवीन टिकीटाचे अनावरण मंगळवार (ता.2) ऑक्‍टोंबरला केले. बुधवारपासून सर्व टपाल कार्यालयात विक्रीसाठी उघडे करण्यात आली. 150 वी जयंती असल्याने सर्व सात टिकीटांचे एक सिट तयार केले आहे.

 या तिकीटांची किमत 150 रुपये ठेवण्यात आली. यासाठी सातही टिकीटांची किमत विषम ठेवण्यात आली आहे. अर्थात पहिल्या वेळेस 12, 22, 25, 41 अशा किमतीचे टिकीट बघवाय मिळणार आहे. शिवाय पहिल्या वेळेस गोलाकार टिकीटाची छपाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहरातील नोट प्रेसमध्ये छपाई झाली आहे. गांधीजीनी बॅरेस्टर झाल्यापासून ते वृद्धपकाळापर्यंतचे जीवन जगत असताना केलेल्या कार्यातून त्याना आलेल्या अनुभवांचे संदेश आणि त्यांच्या सहीचा उल्लेख टिकीटावर दिला आहे. शिवाय संपूर्ण शिटवर " मेरा जीवन ही मेरा संदेश है' असे वाक्‍य ठळक अक्षरात छापण्यात आले आहे. सद्या ह्या टिकीटांचा वापर संग्रहासाठी (फिलाटली) होणार आहे. त्यानंतर काही महिन्यानी नागरीकाना त्याचा वापर टपालासाठी करता येणार असल्याची माहिती टपाल विभागाकडून देण्यात आली आहे. 
... 
असे आहे संदेश 
हिंसा दुर्बळ का शस्त्र है, अहिंसा सबल का. 
स्वच्छता जब भीतरी और बाहरी रहती है, तब वह ईश्‍वरमयता को पहुँचाती है. 
मित्र भाव से रहें तो, जगत का रुप बदल जाए. 
जो जीवन सेवा में व्यतीत होता है, वही फलदायी है. 
सादगी में भलाई है, महत्व है. 
जब आप को मनुष्य खोता है, तब ही आप को पाता है. 
सत्य ही ईश्‍वर है. 

Web Title: marathi news gandhiji ticket collection