"श्रीं' च्या विसर्जनासाठी 26 नैसर्गिक ठिकाणे निश्‍चित, 28 कृत्रिम तलावांची निर्मिती 

residentional photo
residentional photo

नाशिक ः श्री गणराय विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या वतीने यंदाही सहा विभागात मूर्ती विसर्जनाचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी नैसर्गिक 26 तर 28 कृत्रिम तलावांची ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. पूर्व विभागात चार, पश्‍चिम विभागात पाच, पंचवटी सहा, नाशिक रोड पाच, सातपूर पाच, तर सिडको विभागात एक याप्रमाणे 26 नैसर्गिक विसर्जन स्थळे राहतील तर जलप्रदूषण रोखण्यासाठी सहा विभागात 28 ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. पूर्व विभागात सहा, पश्‍चिम सात, पंचवटी तीन, नाशिक रोड, सातपूर व सिडको विभागात प्रत्येकी चार या प्रमाणे कृत्रिम तलाव आहेत. त्याचप्रमाणे पीओपी मुर्तींसाठी अमोनिअम कार्बोनेट पावडर उपलब्ध करून देण्यात आले आहे. 
-------------- 
विसर्जनासाठी नैसर्गिक ठिकाण 
- पूर्व विभाग ः शितळादेवी मंदिर, टाळकुटेश्‍वर घाट, लक्ष्मीनारायण घाट, टाकळी संगम पूल 
- पश्‍चिम विभाग ः यशवंतराव महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, सिद्धेश्‍वर मंदिर घारपुरे घाट, हनुमान घाट 
- पंचवटी विभाग ः चिंचबन गोदा पार्क, म्हसरूळ सीता सरोवर, राजमाता मंगल कार्यालय, नांदूर गोदावरी पूल, कपिला संगम, रामकुंड व परिसर, होळकर पुलालगत, रोकडोबा ते टाळकुटेश्‍वर पूल, गौरी पटांगण 
- नाशिक रोड ः दारणा नदीवरील चेहेडी घाट, विहितगाव, देवळालीगाव, वडारवाडी, दसक घाट 
- सातपूर ः आसारामबापू पुलाच्या उत्तरेचा भाग, आनंदवली येथील चांदशी पुलाखाली, आनंदवलीगाव, सोमेश्‍वर धबधबा, नासर्डी नदी पूल, गणेश घाट, औदुंबर चौक, आयटीआय पूल, शाहूनगर 
- सिडको ः नंदिनी नदी घाट 


विजर्सनासाठी कृत्रिम ठिकाणे 
पूर्व विभाग ः आगर टाकळी येथील रामदास स्वामी मठ, रामदास स्वामीनगर, शिवाजीवाडी पूल, साईनाथनगर चौफुली, कलानगर चौक, रथचक्र सोसायटी, राजीवनगर शारदा शाळेजवळ 
पश्‍चिम विभाग ः चोपडा लॉन्स पूल, चव्हाण कॉलनी, फॉरेस्ट नर्सरी पूल, येवलेकर मळा, दोंदे पूल, उंटवाडी रोड, महात्मनगर पाण्याच्या टाकीजवळ, लायन्स क्‍लब गार्डन, नवीन पंडित कॉलनी 
पंचवटी विभाग ः पेठ रोड, आरटीओ कॉर्नर, दत्त चौक गोरक्षनगर, कोणार्कनगर 
नाशिक रोड ः जेतवननगर, चेहेडी ट्रक टर्मिनस, नारायणबापू चौक, जेल रोड 
सातपूर ः सोमेश्‍वर मंदिर, शिवाजीनगर, अशोकनगर, पाइपलाइन रोड, रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारी, काळेनगर, गंगापूर रोड 
सिडको ः डे केअर सेंटर शाळेजवळ, जिजाऊ वाचनालय, राजे संभाजी स्टेडियम, पवननगर स्टेडियम 


संस्थांचा पुढाकार, मुर्ती दानाचे आवाहन 
जलप्रदुषण रोखण्यासाठी गोदावरी व नंदीनी नदीच्या तिरावर महापालिकेने कृत्रित तलावांची निर्मिती केली तर दक्षता अभियान, उर्जा प्रतिष्ठान, विद्यार्थी कृती समितीच्या आदी संस्थांच्या वतीने निर्माल्य दान व मुर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. मूर्तींवरील रासायनिक रंगद्रव्यांमुळे प्रदुषण होत असल्याने मूर्ती नदीत विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. दान करण्यात आलेल्या मूर्तींचे नंतर विधीवत विसर्जन केले जाणार आहे. 

पीओपी साठी अमोनियम बायकार्बोनेट 
पुण्याच्या धर्तीवर महापालिकेच्या वतीने पीओपी मुर्ती पाण्यात तत्काळ विरघळण्यासाठी अमोनियम बायोकार्बोनेटची पावडर विनामुल्य उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेच्या सहाही विभागात पावडर उपलब्ध असून त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com