फिल्मनगरीचे गाव गंगापूर,शंभरभर चित्रपटांचे चित्रीकरण;

residentional photo
residentional photo

नाशिक ः नाशिक महापालिका क्षेत्रात समाविष्ट, पण गावाने गावपण शहरीकरणातही जपून ठेवलयं. हे गाव आहे गोदाकाठचे गंगापूर. दहा हजार लोकवस्ती असलेल्या गावात माधवराव पेशवे यांच्या आई गोपिकाबाई यांचे वास्तव्य होते. त्यांच्या नावाचा वाडा गावात असून, त्याला भोलाशेठ वाडा म्हणून ओळखले जाते. या वाड्यात "दावेदार', "दुनियादारी' अशा अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. शंभरभर चित्रपटांचे चित्रीकरण इथे झाल्याने "फिल्मनगरी'चे गाव अशी ओळख आहे. 

भोलाशेठ वाड्यात सोनवणे कुटुंब राहते. गावात कालिकामाता, विठ्ठल, मरिआई, जगदंबा अशी मंदिरे आहेत. तसेच पेशवेकालीन मंदिरे आहेत. तीन महादेवाची, एक हनुमान मंदिर व ऐतिहासिक शुद्ध अंबिका मंदिर आहे. दक्षिण वाहिनी गोदावरीच्या काठावरील सोमेश्‍वर मंदिरात श्रावणानिमित्त शंभूभक्तांची गर्दी होते. हे मंदिर चंद्रेश्‍वर राजाने बांधल्याचे इथले दत्तगिरी महाराज सांगतात. या परिसरात चार कुंड होते. बालाजी मंदिर व शंकराचार्य न्यास हेही गावाचे वैभव आहे. त्रिपुरा पौर्णिमेला बालाजी मंदिरात दीपोत्सव होतो. 

धर्मेंद्र यांचे आवडते गाव 
अभिनेता धर्मेंद्र यांचे आवडते गाव असल्याचे ग्रामस्थ मोठ्या अभिमानाने सांगतात. "दुश्‍मन' चित्रपटाचे पूर्ण चित्रीकरण याच परिसरात झाले असून, "प्रतिज्ञा', "मोहब्बत', "दावेदार', "प्रतिघात' आदी चित्रपटांचा झालेल्या चित्रीकरणामध्ये समावेश आहे. अभिनेता शाहरुख खान याच्या पहिल्या "उम्मीद' मालिकेचे चित्रीकरण झाल्याच्या आठवणींना ग्रामस्थ उजाळा देतात. पंचक्रोशीतील गावांची बाजारपेठ म्हणून गंगापूरचा नावलौकिक होता. आता इथे रोज बाजार भरतो. गावातून दरवर्षी गंगापूर- गोवर्धन- पंढरपूर दिंडी जाते. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्यात गावाच्या दिंडीचा क्रमांक अकरावा आहे. गावात हरिपाठ मित्रमंडळातर्फे रोज हरिपाठाचे पठण केले जाते. सोमेश्‍वरची यात्रा प्रसिद्ध आहे. कालिकामाता मंदिरात अखंड सप्ताह होतो. 

मी हनुमान मंदिरात वास्तव्यास असून, गावातील प्राचीन मंदिरे इतिहासाची साक्ष देतात. पेशवेकालीन मंदिरांची मांदियाळी आहे. दक्षिण वाहिनी गोदावरी वाहत असल्याने या क्षेत्राला अधिक महत्त्व आहे. 
- दत्तगिरी महाराज, हनुमान मंदिर 

गावाने आपले गावपण जपत असताना धार्मिक- अध्यात्मिक परंपरा पुढे सुरू ठेवल्या आहेत. स्थानिक प्रत्येक जण मोठ्या उत्साहाने उत्सवामध्ये सहभागी होतात. 
- दौलत पाटील, ज्येष्ठ नागरिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com