गंगापूर धरणाच्या जलपूजनाचा उफाळणार वाद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नाशिक : संत निवृत्ती नाथ महाराज पालखी सोहळा व सामुहिक नमाज पठणावर पालिकेतर्फे होणाऱ्या खर्चाला घालण्यात आलेली बंदी तसेच बी.डी. भालेकर मैदानावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या स्पष्ट नकार. या भूमिकेनंतर आता गंगापूर धरणाच्या जलपुजना वरून वाद निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. धरण 75 टक्के भरले असतांना अद्यापही जलपुजन होत नसल्याने राजकीय पक्षांकडून स्वतंत्ररित्या पुजनाचा कार्यक्रम करण्याची तयारी सुरु झाली आहे. 

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचे दरवर्षी जलपुजन करण्याची परंपरा आहे. शहराचे प्रथम नागरीक म्हणून महापौरांच्या हस्ते जलपुजन होते. जलपुजनावेळी आयुक्तांसह सर्व पदाधिकारी गंगापूर धरणावर जावून पाण्यात नारळ सोडून पुजा करतात. साधारण 75 टक्‍क्‍यांच्या पुढे धरण भरल्यानंतर पुजन करण्याची परंपरा आहे. धरणातून दररोज पाचशे क्‍युसेक पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असून सद्यस्थितित धरणात 77 टक्के पाणी साठा आहे.

75 टक्‍क्‍यांच्या पुढे पाणी साठा गेल्यानंतर पाणी पुरवठा विभागाच्या वतीनेचं जलपुजनाची व्यवस्था केली जाते.पण धरण भरूनही पाणी पुरवठा विभागाकडून तयारी होत नसल्याने यंदा परंपरा मोडीत निघण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मुख्यालयातील देवदेवतांचे फोटो, मुर्ती हटविण्याचे आदेश देण्यात आल्याने आयुक्त मुंढे यांच्या समोर जलपुजनाचा प्रस्ताव ठेवण्यास अधिकारी धजावतं असल्याचे बोलले जात आहे. 
 
Web Title: marathi news gangpur dam vad

टॅग्स