ताणतणाव घालविण्याच्या नावाखाली नशेखोरी 

रईस शेख
रविवार, 28 जुलै 2019

जळगाव : बदलत्या जीवनशैलीचे कारण देत ताणतणाव घालविण्याच्या नावाखाली तरुणांना गांजाच्या विळख्यात ओढले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासाठी तस्करांनी खास गांजाची सिगारेट बाजारात आणली असून, ठरलेल्या पानटपरी चालकांना सांगितल्यावर ऑर्डरप्रमाणे गांजाची सिगारेट 50 ते 75 रुपयाला एक या दराने तयार करून दिली जाते. महाविद्यालय परिसरात अशी सिगारेट ओढणारे अन्‌ विकणाऱ्यांनी कट्टेच तयार केले आहे. 

तरुणाईला नशेच्या जाळ्यात ओढण्यासाठी अगोदर या विशिष्ट पद्धतीने बनविलेल्या गांजाच्या सिगारेटचा झुरका दिला जातो. गाजांचा गाळण केलेला कूट सिगारेटमधील तंबाखू काढून त्या जागी गांजा भरला जातो. गांजाची ही सिगारेट सहज उपलब्ध होते. शहरात बहुतांश विक्रेत्यांनी गांजाची तयार सिगारेटच विक्रीसाठी उपलब्ध केली असून 50 रुपयाला एक व एक हजार रुपयांचे पाकीट अशा पद्धतीने विक्री होत आहे. 

रॅपर कागदही उपलब्ध 
चीन येथून खास रॅपर कागद आयात केला जातो. जळगाव शहरात ठराविक ठिकाणी 20 रुपयांत 50 रॅपर असलेले पॅकेट मिळते. या कागदाची पुंगळी केल्यावर त्यात गांजा मळून ठासला जातो. या कागदाला फिल्टरही लावण्याची सोय असते. 
 
जीवघेणी नशा 
ज्या पदार्थांच्या सेवनामुळे गुंगी येते, तसेच मेंदू उत्तेजित होतो, अशा पदार्थांना सर्वसाधारणपणे अमली पदार्थ म्हणतात. चरस, गांजा, भांग, अफू, कोकेन, हेरॉइन, मार्फीन, केटामाइन यासदृश पदार्थ अमली पदार्थांच्या व्याख्येत मोडतात. या पदार्थांच्या सेवनाने मेंदूची क्रिया तसेच शारीरिक हालचालीही मंदावतात. या पदार्थांच्या सेवनातून तरुण चिंता, ताणतणावमुक्त होण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हीच नशा जीवघेणी ठरू शकते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ganja cigarate nasha