कचरा उचलण्यावरून  वेस्ट टू एनर्जी, घंटागाडी कर्मचाऱ्यांमध्ये वाद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

नाशिक : महापालिकेत घंटागाडी सुरु झाल्यापासून कचरा उचलण्यावरून वाद झाला असे उदाहरण शोधूनही सापडणार नाही परंतू सध्या शहरात हॉटेल मधून बाहेर पडणारा कचरा तातडीने उचलला जात असल्याने यावरून घंटागाडी कर्मचारी व वेस्ट टू एनर्जी कंपनीचे कर्मचारी यांच्यात वाद होण्याचे प्रकार सातत्याने घडतं असल्याने त्यावर पर्याय म्हणून घनकचरा व्यवस्थापन विभागाने वेस्ट टू एनर्जी कर्मचाऱ्यांची बाजू घेत ठराविक वेळेत हॉटेलचा कचरा उचलण्यासाठी परवानगी दिल्याने तुर्त वाद मिटला असला तरी जेथून कमाई होते तेथील कचरा तातडीने कसा उचलला जातो याचे ज्वलंत उदाहरण यानिमित्ताने समोर आले आहे. 

शहरात सहा विभागात घंटागाडी मार्फत कचरा उचलला जातो. यापुर्वी शंभर टक्के कचरा उचलला जात नसल्याने महापालिकेने जीपीएस यंत्रणा बसविण्यासाठी घंटागाडीचे ट्रॅकींग करण्यास सुरुवात केली आहे. असे असूनही संपुर्णपणे कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यात महापालिकेने ओला व सुका असे वर्गिकरण करून कचरा देण्याचे फर्मान काढले आहे. महापालिकेच्या खत प्रकल्पावर वेस्ट टू एनर्जी कंपनी मार्फत वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यातून मासिक 99 हजार किलो वॅट वीज निर्मितीचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी वेस्ट टू एनर्जीला पंधरा टन ओला कचऱ्याची आवशक्‍यता आहे.

   गेल्या सात ते आठ महिन्यांपासून ओला कचरा हवा त्या प्रमाणात प्राप्त होत नसल्याने वीज निर्मितीचे उद्दीष्ट गाठता येत नाही. त्यामुळे महापालिकेने हॉटले चालकांना सक्तीने ओला कचरा देण्याच्या सुचना काढल्या आहेत. परंतू वेस्ट टू एनर्जीचे कर्मचारी ओला कचरा संकलित करण्यासाठी जाण्याअगोदरचं घंटागाडीचे कर्मचारी तो कचरा संकलित करतं असल्याने वेस्ट टू एनर्जीला ओला कचरा प्राप्त होत नाही. त्यातून वाद निर्माण होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. हॉटेलचा कचरा उचलण्यासाठी मोबदला मिळतं असल्याने त्यातून वाद होण्याचे प्रकार वाढल्याचे समजते. 
 
Web Title: marathi news garbage collect producre