घंटागाड्यांच्या अनियमिततेबरोबरच ठेकेदारांकडून अर्टी-शर्तींचा भंग 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

 नाशिक ः शहराच्या सहा विभागांत कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांमध्ये अनियमितता असून, ठेकेदारांकडून अटी-शर्तींचा भंग होत असल्याचे या संदर्भात नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले. आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे हा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यात जीपीएस मार्गावरून घंटागाडी न जाणे, पुरेशी वाहने न देणे, सरासरीपेक्षा कमी कचरा संकलन करणे आदी आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. 

सन 2015 मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेला कुठलीही आर्थिक झळ न बसता बीओटी तत्त्वावर कचरा संकलन करण्याचा निर्णय घेतला होता. नगरसेवकांनी प्रभागनिहाय घंटागाडी सुरू करण्याची मागणी केली होती. डॉ. गेडाम यांनी सहा विभागांत सहा स्वतंत्र ठेकेदार नियुक्त करण्याचा निर्णय त्या वेळी घेतला होता. घंटागाडी सुरू झाल्यापासून तक्रारींचा ओघ सुरू होता. अटीनुसार दोनशेपेक्षा अधिक घंटागाड्या चालविल्या जात नसल्याचे उघड झाले होते

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ghanta gadi