घंटागाडी अनियमितते प्रकरणी जी.टी. पेस्ट कन्ट्रोलला सर्वाधिक दंड 

residentional photo
residentional photo

नाशिक- महापालिकेने पाच वर्षांसाठी घंटागाडीचा ठेका देताना ठेकेदारांकडून अनियमितता आढळल्यास दंडात्मक कारवाईचा पर्याय दिला आहे त्यानुसार गेल्या दोन वर्षात घंटागाडी ठेकेदारांकडून तीन कोटी 16 लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असून सर्वाधिक दंड सिडको व पंचवटी विभागात घंटागाडी सेवा देणाऱ्या जी.टी. पेस्ट कन्ट्रोलला करण्यात आला असून दंडाची रक्कम दोन कोटी 48 लाख रुपये आहे. 

महापालिकेने सन 2016 मध्ये पाच वर्षांसाठी 176 कोटी रुपयांचा घंटागाडीचा ठेका दिला. त्यापुर्वीच्या तक्रारींची दखल घेवून घंटागाडी वेळेत न पोहोचणे, कर्मचाऱ्यांना किमान वेतनासह सुरक्षेची साधने पुरविणे, जीपीएस यंत्रणा बसविणे, निर्धारीत मुदतीत घंटागाडी न आणणे यावर दंड आकारणी करण्याचा निर्णय घेतला होता. दंडात्मक कारवाईच्या भितीने ठेकेदारांकडून नियमितपणे घंटागाडी चालविली जाईल अशी अपेक्षा होती

पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या दंडात्मक कारवाई वरून घंटागाडी चालविण्यात अनियमितता असल्याचे दिसून येत आहे. अनियमिततेमुळे सिडको व पंचवटी विभागातील ठेकेदार जी.टी. पेस्ट कन्ट्रोलला दोन वर्षात दोन कोटी 48 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पुर्व व सातपूर विभागात घंटागाडी चालविणाऱ्या मे. आसिफअली सय्यद कंपनीला पुर्व विभागातील अनियमिततेमुळे 31 लाख 47 हजार तर सातपूर विभागातील अनियमिततेमुळे सोळा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पश्‍चिम विभागात मे. वॉटरग्रेस प्रॉडक्‍टस्‌ कंपनी ठेकेदाराकडून चौदा लाख 30 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. नाशिकरोड विभागात मे. तनिष्क सर्व्हिसेस ठेकेदार कंपनीकडून 5 लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दंडाची रक्कम ठेकेदारांना दिल्या जाणाऱ्या देयकांमधून वर्ग केली जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com