घोटीजवळ रेल्वेचा रुळ तुटला ; कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला

पोपट गवांदे
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

इगतपुरी शहर -मध्य रेल्वेच्या मुंबई-भुसावळ मार्गावर घोटी रेल्वे स्थानकाजवळील रामरावनगर येेथील मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाचा तुकडा तुटल्याची घटना आज सकाळी घडली. या भागातून कर्तव्यावर असणाऱ्या रेल्वे कार्मचाऱ्याच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने सतर्कता दाखवुन वरिष्ठांना या प्रकरणी माहिती दिली. ९ वाजून ४५ मिनिटांनी जाणारी सेवाग्राम एक्सप्रेस यामुळे रोखण्यात आली. 

रेल्वे रूळ तुटल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात होण्यापासून बचाव झाला. दरम्यान तुटलेल्या रुळाला तात्पुरते जोडले गेले असून गाड्यांना संथ वेगाने दहा मिनिटे उशीराने धावत होत्या. घोटी परिसरातील रामरावनगर भागातून मध्य रेल्वेचे रूळ गेले आहेत.

  रेल्वेचे कर्मचारी भूषण गुप्ता, राजेंद्र गोडे, विजयकुमार सूर्यवंशी, अर्जुन सानप हे साडेनऊच्या दरम्यान या भागातून जात असतांना मुंबईकडे जाणाऱ्या रुळावर मोठा तुकडा पडून तुटला असल्याचे त्यांना समजले. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकार्यांना माहिती दिली. 
   
सकाळी पावणेदहाला जाणारी सेवाग्राम एक्सप्रेस आधीच्या स्टेशनला थांबवण्यात आली. या घटनेमुळे या गाडीचा संभाव्य अपघात सुदैवाने टळला. वरिष्ठांच्या सूचनेनुसार तुटलेल्या रुळाला तात्पुरते जोडण्यात आले. गाड्या आता दहा मिनिट उशिराने संथ धावत आहेत. दुपारपर्यंत रुळावर भक्कम काम करण्यात आल्याची माहीती रेल्वेच्या सुत्रांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ghoti railway line crack