गिरीश महाजनांची बंडखोरीबाबत गुगली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

पाचोराः पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना,भाजप, मित्रपक्षांचा आज संयुक्त विजयी संकल्प मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बंडखोरीबाबत शिताफीने विषय टाळला. या मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्यासंदर्भात आमदार किशोर पाटील यांनी स्पष्टीकरण देण्यासंदर्भात गिरीश महाजन यांना केलेली सूचना मात्र अपयशी ठरली. ‘किशोरअप्पांना पुन्हा मतदान करा, तेच पुन्हा आमदार होतील’ असे म्हणत त्यांनी गुगली टाकली. भाषण संपण्याच्या वेळी पुन्हा उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाजनांना प्रतिप्रश्न केला, की ‘अमोल शिंदे आपल्या नावाचा वापर करतात.

पाचोराः पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना,भाजप, मित्रपक्षांचा आज संयुक्त विजयी संकल्प मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बंडखोरीबाबत शिताफीने विषय टाळला. या मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्यासंदर्भात आमदार किशोर पाटील यांनी स्पष्टीकरण देण्यासंदर्भात गिरीश महाजन यांना केलेली सूचना मात्र अपयशी ठरली. ‘किशोरअप्पांना पुन्हा मतदान करा, तेच पुन्हा आमदार होतील’ असे म्हणत त्यांनी गुगली टाकली. भाषण संपण्याच्या वेळी पुन्हा उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाजनांना प्रतिप्रश्न केला, की ‘अमोल शिंदे आपल्या नावाचा वापर करतात. त्याबाबत स्पष्टीकरण द्या’ त्यावर महाजनांनी ‘मी एकदा सांगितले ना, की महायुतीच सर्व जागा जिंकेल. किशोर पाटीलच पुन्हा आमदार होतील. कोणाला मते द्या, कोणाला देऊ नका हे पुन्हा सांगायची काय गरज आहे. उगीच कोणाला मोठे करण्यात काय अर्थ आहे’ अशी गुगली म्हणत महाजन यांनी आपले मनोगत संपवले. 
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना,भाजपा, रिपाइं आठवले गट, शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती व एकलव्य संघटना महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ आज झालेल्या शिवसेना-भाजपचा संयुक्त विजयी संकल्प मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार किशोर पाटील, संपर्क प्रमुख सुनील पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश सोमवंशी, जिल्हा परिषदेचे सदस्य रावसाहेब पाटील, दीपकसिंह राजपूत, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, ॲड. अभय पाटील, उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, दिनकर देवरे, गणेश पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, भडगावचे नगराध्यक्ष अतुल पाटील, प्रतापराव पाटील, पदमसिंह राजपूत, रवींद्र पाटील, अनिल पाटील, हरिभाऊ पाटील, पप्पू राजपूत, भरत पाटील, संदीपराजे पाटील, अनिकेत सूर्यवंशी, जितेंद्र पेंढारकर, शेख जावेद, भरत खंडेलवाल, अंकुश कटारे, सुनील गौड, सतीश चेडे, वाल्मीक पाटील, आनंद पगारे, दादाभाऊ चौधरी, राजेंद्र परदेशी, जितेंद्र जैन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 
याप्रसंगी शेवाळे, वडगाव, सातगाव डोंगरी, शिंदाड, वाडे, पाचोरा, कृष्णापुरी येथील युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आमदार किशोर पाटील यांच्या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले. आमदार किशोर पाटील यांनी पाच वर्षांत केलेल्या ८०० कोटींच्या विकासकामासंदर्भात स्पष्टीकरण दिले. 
गिरीश महाजन यांनी आपल्या खास शैलीत पाचोऱ्यात निवडणुकीचा जोर जास्त असल्याची कोटी करीत आघाडीला एकही जागा मिळणार नाही. सर्वच्या सर्व अकरा जागा जिंकून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्या दृष्टीने कामाला लागा. हातचे राखून आता चालणार नाही. शासनाने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवा, असे सांगून पुढील काळात तापीचे पाणी प्रत्येक तालुक्यात आणून हरितक्रांतीचे स्वप्न साकारण्यासाठी दोन हजार कोटीची भागपूर योजना राबविणार असल्याचे सांगितले. येत्या १३ ऑक्टोबरला जळगाव येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला रेकॉर्डब्रेक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. रावसाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. नाना वाघ यांनी सूत्रसंचालन व गणेश पाटील यांनी आभार मानले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news girish mahajan bandkhori googali