सात दिवसात पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत : गिरीश महाजन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

जळगाव : गेल्या पन्नास ते साठ वर्षात प्रथमच जिल्ह्यात पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण शेतातील पिकांची हानी झाली आहे. अधिकाऱ्यांनी आता कोणतीही सुटी न घेता सात दिवसाच्या आत पंचनामे करून शासनाला अहवाल द्यावा. शासनातर्फे शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल. अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. 

पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जलसपंदामंत्री गिरीश महाजन आज तातडीने मुंबईतून विमानाने जळगावात दाखल झाले, त्यांनी जळगाव तालुक्‍यातील डांभूर्णी, विदगाव, ममुराबाद परिसरात थेट शेतीच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली.शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलाविली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे,जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले,आमदार चंदूलाल पटेल, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यानीं अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. 
यावेळी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, जिल्हयात पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शंभर टक्के पिके वाया गेलेली आहेत. गेल्या पन्नास ते साठ वर्षात प्रथमच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कोणतीही सुटी न घेता अधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून नुकसानीचे पंचनामे करावेत असे आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे केल्यामुळे पिक विम्याचे रक्कम मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. ज्यांचे पंचनामे होणार नाहीत, त्यांनी मोबाईलवर नुकसानीचे फोटो काढून पाठवावे असेही त्यांनी स्पष्ट केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news girish mahajan panchname farmer 7 days help