शस्त्र संग्रहालय उद्यानात मुलींना डांबले,सुरक्षारक्षकाचा प्रताप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

नाशिक- गंगापूर रोड येथील कै. बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयातील उद्यानात रात्री आठ वाजेनंतरही काही मुली फिरत असल्याने येथील सुरक्षारक्षकाने उद्यानाचे प्रवेशद्वार लावून घेत डांबून ठेवण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. सुमारे आठ ते दहा लहानमुलींनी आरडोओरड केल्यानंतर स्थानिक नागरिक जमले. त्यानंतरही सुरक्षारक्षकाने गेट उघडण्यास नकार दिल्याने अखेरीस पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसी खाक्‍या दाखविल्यानंतर गेट उघडून मुलींची सुटका करण्यात आली. गंगापुर पोलीस ठाण्यात सुरक्षारक्षका विरोधात तक्रार दाखल करण्यात आली

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news girls in garden