गिरणा' धरणातुन 20 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग 

सुधाकर पाटील
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

भडगाव:  गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्याप्रमाणात पाऊस बरसत असल्याने धरणात पाण्याचा फ्लो वाढत आहे. आज सकाळी साडेपाच वाजता दहा हजार ने तर टप्प्याटप्प्याने अकरा वाजता 20 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गिरणा नदिला मोठा पुर येण्याची शक्यता आहे.  

भडगाव:  गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्याप्रमाणात पाऊस बरसत असल्याने धरणात पाण्याचा फ्लो वाढत आहे. आज सकाळी साडेपाच वाजता दहा हजार ने तर टप्प्याटप्प्याने अकरा वाजता 20 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गिरणा नदिला मोठा पुर येण्याची शक्यता आहे.  
गिरणा धरण एका तपानंतर 17 सप्टेंबर ला ओव्हरफ्लो झाले. तेव्हापासुन धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सुरवातीला 1500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता. दोन दिवसपुर्वी साडेसात हजार क्युसेकने विसर्ग सुरू झाला होता.मात्र त्यानंतर पुन्हा विसर्ग अडीच हजारवर आला होता. पण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात आवक मोठ्याप्रणात वाढत आहे. आज सकाळी दहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यानंतर नऊ वाजता पुन्हा अडीच हजाराने विसर्ग वाढविण्यात आला. तर पुन्हा अर्धा तासाने अडीच हजाराने विसर्ग वाढुन 15 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग गेला. त्यानंतरही धरणात पाण्याचा फ्लो वाढल्याने अकरा वाजता धरणातुन एकुन 20 हजार क्युसेसने सुरू करण्यात आल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी हेमंत पाटील यांनी दिली. धरणाचे एकुन सहा दरवाजे 2-3 फुटाने उघडविण्यात आले आहे. 2006 नतंर पहील्यांदाच गिरणेला एवढ्या मोठ्याप्रणात पाणी वाहत आहे. गिरणेला मोठा पुर येणार आहे. त्यामुळे काठावरच्या गावकर्यानी सतर्कता बाळगावी असे आवाहन गिरणा पाटबंधारे चे उपविभागीय अधिकारी हेमंत पाटील यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news girna dam 20 thousand qusek