गिरणा काठच्या गावात दवंडी पिटवून सतर्कतेचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

जळगाव : गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी जोरदार पाउस झाला. यामुळे गिरणा धरण फुल्ल भरले असून, धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आज दुपारच्या सुमारास धरणातून 1 लाख क्‍युसेसने पाणी सोडण्यात आल्याचे सांगण्यात असून, गिरणा नदिला मोठा पुर आला आहे. यामुळे नदी काठच्या गावांमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यासाठी गाडी फिरवून दवंडी पिटली जात आहे. 

गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल पाउस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. शिवाय रात्रीपासून पाण्यात सातत्याने वाढ होत आहे. आज सकाळी देखील पाऊस झाल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे धरणातुन सकाळी सात वाजेपर्यंत 75 हजार क्‍युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मात्र दुपारी बारानंतर धरणातून सुमारे एक लाख क्‍युसेस पाणी सोडण्यात आल्याचे सांगत नदी काठच्या ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याकरीता गावागावांमध्ये जावून नदीच्या काठावर न थांबण्याचा इशारा देणारी दवंडी पिटली जात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news girna river pur village prashashn alaunced