महापालिकेकडूनच गोदावरी नदीत प्रदूषण,गोदावरी गटारीकरण विरोधी मंचची तक्रार 

residentional photo
residentional photo


नाशिकः गोदावरी नदीत गटारीचे सांडपाणी मिसळत नसल्याचे महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देउनही आणि नदीपात्र प्रदूषण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.मात्र प्रशासनाकडून कुठल्याही कारवाया होत नसल्याची तक्रार गोदावरी गटारीकरण विरोधी मंचातर्फे करण्यात आली आहे. 
 

 गोदावरी नदीपात्रात पून्हा एकदा सर्रास कपडे धुणे,गाड्या धुणे, निर्माल्य टाकून नदीपात्र प्रदूषित करण्याला वेग आला आहे. त्याविरोधात कारवाई करणे व गुन्हे दाखल करण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केलेली आहे, परंतु गोदावरी नदीत गटारीचे पाणी सोडणाऱ्या नाशिक महापालिकेचाच पुढाकार सुरु असल्यासारखी स्थिती आहे. गोदावरी नदीपात्रात सध्या सर्रास महापालिकेच्या गटारीचे सांडपाणी मिसळते आहे. गोदावरीची काळजी घेण्याची जबाबदारी असलेली नाशिक महापालिकाच गोदावरी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी सक्षम नसल्याने महापालिकेच्या गटारी नदीपात्रात मिसळत आहेत. त्यामुळे महापालिकेवर कारवाई होण्याची मागणी श्री पगारे यांनी केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com