Election Results .युतीच्या हेमंत गोडसेंची आघाडी कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी ८५८५ मतांची आघाडी घेतली . पहिल्या फेरीत गोडसे यांना तब्बल २५००५ मत मिळाली तर काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना १६४२० मतांवर समाधानी राहावे लागले . भाजपशी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविणारे माणिकराव कोकाटे जेमतेम ७२१८ मतांचा पल्ला गाठू शकले . वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांना अवघी २८६८ मत मिळाली .

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी ८५८५ मतांची आघाडी घेतली . पहिल्या फेरीत गोडसे यांना तब्बल २५००५ मत मिळाली तर काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना १६४२० मतांवर समाधानी राहावे लागले . भाजपशी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविणारे माणिकराव कोकाटे जेमतेम ७२१८ मतांचा पल्ला गाठू शकले . वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांना अवघी २८६८ मत मिळाली .

    नाशिक लोकसभा मतदार संघातील मतमोजणीला जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश मांडरे यांच्या नेतृत्वाखाली प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात टपाली मतांची मोजणी करण्यात आली मात्र या मतमोजणी दरम्यान ेeलेट्रॉनिक ट्रान्स्मिटेड पोस्टल बॅलेटच्या स्कॅनिंगला बिघाडाचा सामना करावा लागल्याने टपाली मतांच्या मोजणीला विलंब झाला. याचवेळि ईव्हीएममधील मतांच्या मतमोजणीला विधानसभा मतदान प्रारंभ करण्यात आला. तब्बल अडीच तासानंतर पहिल्या फेरीची मतमोजणी जाहीर करण्यात आली .  

पहिल्या फेरीत शिवसेनेच्या गोडसे यांना सर्वाधिक २५००५ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे भुजबळ १६४२०  मत मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिले . अपक्ष कोकाटे यांना ७२१८ मतांवर समाधान मानावे लागले. विधानसभा मतदारसंघनिहाय पहिल्या फेरीतील मतांचा विचार करता नाशिकमध्ये मतदार संघातून हेमंत गोडसे यांना सर्वाधिक ६३१६ मत मिळाली तर भुजबळ यांना १७६२ मते मिळाली . कोकाटे ३७८ मतांवर राहील े. नाशिक पूर्व मतदारसंघातही गोडसे यांची आघाडी पहिल्या फेरीत कायम राहिली गोडसे यांना ५५५९ मते मिळाली तर समीर भुजबळ यांना २००४ मतांवर समाधानी राहावे लागले .

कोकाटे यांना या मतदारसंघातून अवघी ३३९मते मिळाली . नाशिक पश्चिममध्ये ही गोडसे यांच्या आघाडी कायम राहिली त्यांना ४८९३ इतकी मते मिळाली. भुजबळ यांना १३३५ या मतांवर समाधान मानावे लागले तर कोकाटे त्यांच्या झोळीत केवळ २८९ मते मिळाली . सिन्नर मतदारसंघामध्ये मात्र कोकाटे यांनी जोरदार मुसंडी मारली . पहिल्या फेरीत या मतदारसंघात कोकाटे यांना ४६८० इतकी मते मिळाली दुसऱया क्रमांकावर भुजबळांना २२८३ इतकी तर गोडसे  यांना २२११ इतकी मत मिळवत तिसऱया क्रमांकावर रहावे लागले .   गोडसे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या देवळाली मतदार संघातही भुजबळ यांनी आघाडी घेतली त्यांना ४४९८ इतकी मते मिळाली कोकाटे यांना या मतदारसंघातून अवघी ६३६ मत मिळाली . इगतपुरी मतदार संघातही भुजबळ यांनी आघाडी घेतली त्यांना ४३३८ इतकि,  दुसऱ्या क्रमांकावरील गोडसे यांना १८५८तर कोकाटे यांना ८९६इतकी मत मिळाली.
-
पहिल्या फेरीतील उमेदवारनिहाय मते 
अँड.वैभव अहिरे ३३२
हेमंत गोडसे २५००५
समीर भुजबळ १६४२०
सोनिया जावळे १०२१
पवन पवार २८६८
 विनोद शिरसाठ ८१
शिवनाथ दातार ६६
संजय घोडके ६२
 शरद आहेर ८६
 प्रकाश कनोजे ६६
 केदार सिंधू १२५
अॅडवोकेट माणिकराव कोकाटे ७२१८
 देवीदास सरकटे ४२७
 धनंजय भावसार १७३
 प्रियांका शिरोळे १४०
 विलास देसले २६२
 शरद धनराव ५७
 सुधीर देशमुख १२६
नोटा ४०८ 
 एकूण मतमोजणी ५४९४२


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news godse leading