गोडसे विजयी झालेचं कसे?अपक्ष उमेदवार कोकाटेंना पडला प्रश्‍न 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जून 2019

नाशिक- नुकत्याचं पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे हेमंत गोडसे त्यात विजयी झाले परंतू त्यांना हा विजय मिळालाचं कसा? असा सवाल अपक्ष उमेदवार व तिसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या ऍड. माणिकराव कोकाटे यांनी केला असून नाशिक लोकसभेचा निकाल संभ्रम निर्माण करणारा असल्याचे सांगताना मला ज्या समाजाने पाठींबा दिला त्या समाजाची मते गेली कुठे असा प्रश्‍न त्यांनी माध्यमांसमोर मांडला. 

गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल बाहेर पडल्यानंतर प्रथमचं कोकाटे माध्यम प्रतिनिधींसमोर आले. ते म्हणाले, कार्यकर्त्यांचाचा आग्रह, आदीवासीं व मुस्लिमांचा पाठींबा मिळाल्याने विजयाची खात्री झाली व निवडणुक लढविली. कोठून किती मतदान पडेल याचा देखील अंदाज होता. मात्र निकालातून बाहेर पडलेली आकडेवारी अनाकलनीय आहे. ज्या मतांचा अंदाज बांधला होता. तेथे कमी-अधिक प्रमाण लक्षात घेतले तरी अपेक्षित मतदान पडले नाही. वकील वाडीतील प्रचारकांच्या कुटूंबातील शंभर टक्के मतदान अपेक्षित होते तेथे देखील क्षुल्लक मतदान झाले. लोकसभेचा निकाल माझ्यासाठी संभ्रम निर्माण करणारा आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news godse win