"गोखले'मध्ये नोकरीचे आमिष दाखवत महिलेने घातला 11 लाखांना गंडा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

नाशिक : शहरातील नामांकित गोखले एज्युकेशन संस्थेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 27 वर्षीय महिलेने दाम्पत्याला तब्बल 11 लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गोखले एज्युकेशन संस्थेच्या बनावट कागदपत्रांसह सही-शिक्‍क्‍यांचा वापरही तिने केल्याचे समोर आले. संस्थेचे सचिव मो.स. गोसावी यांच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिसात संशयित सौ. रसिका महेश मुळे-गायधनी (पंचवटी) विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मोरेश्वर सदाशिव गोसावी (82, रा. अनुबंध बंगला, मॉडेल कॉलनी, कॉलेज रोड) यांच्या फिर्यादीनुसार, उपनगर परिसरातील गुरव दाम्पत्याकडून संशयित सौ. रसिका महेश मुळे-गायधनी हिने गोखले एज्युकेशन संस्थेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यापोटी तिने 24 मे 2017 ते 10 फेब्रुवारी 2018 यादरम्यान, वेळोवेळी 11 लाख रुपये घेतले होते. संशयित रसिका मुळे हिने बेरोजगारांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी संस्थेच्या नावाची बनावट कागदपत्रे तयार केली. संस्थेचे बनावट शिक्के व त्या कागदपत्रांवर बनावट सह्या देखील केल्या आहेत. याच बनावट कागदपत्रांच्या आधारे तिने गुरव दाम्पत्यांस विश्‍वास घेऊन त्यांच्याकडून 11 लाख रुपये उकळले. याचरितीने तिने अनेकांना गंडा घातला असण्याची शक्‍यता आहे. 
ही बाब संस्थेच्या लक्षात आल्यानंतर त्यासंदर्भातील शहानिशा केली असता, बनावट कागदपत्रे व शिक्‍क्‍यांसह सह्या केल्याचे समोर आले. त्यानुसार संस्थेचे सचिव मो.स. गोसावी यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित विवाहित रसिका मुळे-गायधनी हिच्याविरोधात फिर्याद दिली आणि गुन्हा दाखल झाला आहे. तर संशयित महिला पसार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. 

Web Title: marathi news gokhale fraud