शासकीय योजनेच्या नावाखाली नागरिकांची लूट... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नाशिक: शासनाच्या "बेटी बचाओ-बेटी पढाओ' आणि "माझी कन्या भाग्यश्री' या शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांकडून फॉर्मद्वारे माहिती भरून घेत त्याची आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारीनंतर महिला व बालविकासामार्फेत असे कुठल्याही प्रकारची माहिती न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

नाशिक: शासनाच्या "बेटी बचाओ-बेटी पढाओ' आणि "माझी कन्या भाग्यश्री' या शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांकडून फॉर्मद्वारे माहिती भरून घेत त्याची आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारीनंतर महिला व बालविकासामार्फेत असे कुठल्याही प्रकारची माहिती न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

शासनाच्या योजनेसाठी आमची संस्था शहरासह जिल्ह्यात"बेटी बचाओ-बेटी पढाओ' आणि "माझी कन्या भाग्यश्री' या शासकीय योजनेतंर्गत मुलगी असलेल्यांना दोन लाख रूपयांपर्यंतचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून माहितीसह नागरिकांकडून फॉर्म भरून त्यांच्याकडून दोनशे ते तीनशे रूपये गोळा केली जात असल्याची माहिती दिल्ली येथील भाजपाच्या कार्यालयातून नाशिक येथील पदाधिकाऱ्यांना केल्यानंतर यासंदर्भात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी तडक जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली. 

   तक्रारीबाबत जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या महिला व बालकल्याण विकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधला असता खासगी संस्थेमार्फेत अशा कुठल्याही प्रकारचे शासकीय योजनेसंदर्भात फॉर्म भरून घेतले जात नसल्याचे किंवा कोणीचीही यासाठी नियुक्ती केली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगताच या प्रकरणाचे बिंग फुटले. त्यामुळे अशा प्रकारे शासनाच्या कुठल्याही योजनेंतर्गत पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवित फॉर्म भरून घेणाऱ्यास कुठल्याही प्रकराची माहिती न देता त्याची पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विकास विभागातर्फे करण्यात आले आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातून यातक्रारी संदर्भात माहिती मिळताच अशा कुठल्याही शासकीय योजनेतंर्गत फॉर्म भरून माहिती घेतली जात नसल्याचे व याकामी कोणास नियुक्त केले नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयास कळविण्यात आले. जर कोणी अशी माहिती घेवून फॉर्म भरून देण्याच्या मोबदल्याचे पैसे स्वीकारत असेल तर त्याची माहिती पोलिस ठाण्यात द्यावी 
दत्तात्रय मुंडे (महिला व बालविकास अधिकारी) 

Web Title: marathi news government scheme fraud