नाशिकला 502 पैकी 310 ग्रामपंचायतीच्या जागांवर उमेदवारच नाही 

नाशिकला 502 पैकी 310 ग्रामपंचायतीच्या जागांवर उमेदवारच नाही 

नाशिकः स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या कित्येक वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील शेकडो आदिवासी बहुल गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूका म्हणजे एक सोपस्कार असतो. ठराविक दिवसानंतर निवडणूका लागतात. त्यानंतर पोटनिवडणूका लागतात. मुदत संपल्यानंतर पून्हा पोटनिवडणूका..वर्षानुवर्षापासून उमेदवार मिळत नाही म्हणून हे निवडणूकांचे चक्र सुरु आहे. 
आदिवासी गावात इतर मागासवर्गीय किंवा अनुसुचित जातीची कुटुंबच नगण्य राहतात. जे राहतात. त्यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र असतेच असे नाही. त्यामुळे निवडणूका लागल्या तरी, ठराविक प्रवर्गातील उमेदवार मिळत नाही. त्यामुळे हे चक्र सुरु आहे. 

सध्याही जिल्ह्यात 280 ग्रामपंचायतीमध्ये 502 जागांसाठी पोटनिवडणूका लागल्या आहे. त्यापैकी 89 गावातील 140 जागां एकच उमेदवार मिळाल्याने बिनविरोध 
झाल्या. तर तब्बल 167 ग्रामपंचायतीत 310 जागांवर एकही उमेदवारच मिळाले नाही. त्यामुळे 310 जागा उमेदवार नसल्याने रिक्त रहाणार आहे. दुदैव म्हणजे यात टाकी घोटी (ता.इगतपुरी) या गावातील सरपंचपदाचा समावेश आहे. 
महिला सरपंचपदासाठी राखीव असलेल्या जागेवर गावात एकही महिला उमेदवारही नसल्याने गावाचे सरपंचपदही रिक्त राहिले. 280 गावातील 502 जागांवरील पोटनिवडणूकीच्या सगळ्या प्रक्रियेत अवघ्या 38 ग्रामपंचायतीत 52 जागांवरच एकाहून आधिक उमेदवार मिळाल्याने तेथेच पोटनिवडणूका होणार आहेत. 89 गावातील 140 जागा बिनविरोध झाल्या. 

आदिवासी गाव 
नाशिक जिल्ह्यात सात आदिवासी तालुके असून आदिवासी बहुल गावांची संख्या मोठी आहे. गावच्या गाव आदिवासी असल्याने अशा गावांत इतर मागासवर्गीय तसेच 
अनुसुचित जातीच्या कुटुंबाची संख्या अगदी नगण्य आहे. एखाद दुसरा अपवादाचे घर वगळता, आदिवासी गावात राखीव गटांच्या जागांवर त्या त्या समाजाचे उमेदवारच मिळत नाही. समजा, अपवादाने एखाद दुसर कुटुंब मिळालेच, तर त्यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र असतेच असे नाही. त्यामुळे निवडणूका लागल्या तरी, उमेदवार मिळत नाही. वर्षानुवर्षापासून जिल्ह्यातील आदिवासी गावांमध्ये राखीव गटाच्या जागांवर हेच घडत आहे. उमेदवारच मिळत नाही म्हणून तेथे फक्त तेथे ठराविक दिवसांनी पोट निवडणूका जाहीर होतात. यंत्रणाकडून नेहमीचा सोपस्कार म्हणून त्या निवडणूकांचा कार्यक्रम पार पाडला जातो. 

गावाला सरपंच मिळेना 
टाकी घोटी (ता.इगतपुरी) गावात सरपंचपदासाठी उमेदवार मिळाला नाही. अनुसुचित जमाती महिलेसाठी सरपंचपद राखीव असलेल्या गावाला सरपंचपदासाठी महिला मिळाली 
नाही. त्यामुळे सरपंचपद रिक्त आहे. 

जिल्हा नाशिक पोट निवडणूक बिनविरोध उमेदवार मिळाले नाही 
तालुका ग्रामपंचायती जागा ग्रामपंचायत जागा ग्रामपंचायती जागा 
देवळा 11 13 4 4 7 9 
पेठ 09 10 2 2 5 5 
त्र्यंबकेश्‍वर 16 29 3 4 12 23 
दिंडोरी 36 75 9 15 23 55 
इगतपुरी 17 29 4 6 13 23 
सिन्नर 09 13 2 3 4 6 
मालेगाव 34 69 17 30 11 20 
चांदवड 14 46 9 17 7 29 
बागलाण 49 91 7 11 38 72 
सुरगाणा 4 4 1 1 3 3 
नांदगाव 9 10 2 2 6 7 
येवला 10 10 3 3 4 4 
निफाड 19 27 7 11 12 13 
नाशिक 18 34 6 10 9 20 
कळवण 25 42 13 21 13 21 
एकुण 280 502 89 140 167 310 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com