जिल्ह्यात 67 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

नाशिक ः जिल्ह्यातील सात तालुक्‍यांतील 67 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. 23) सकाळी साडेसातपासून मतदान होत आहे. निवडणुकीच्या मतदानासाठी सुरू असलेला प्रचार शुक्रवारी थांबला. प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींसह जुलै ते सप्टेंबर या काळात मुदत संपणाऱ्या 74 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज माघारीनंतर निफाडच्या तीन, इगतपुरी दोन दिंडोरी व कळवणच्या प्रत्येकी एक याप्रमाणे सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राहिलेल्या 67 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान आहे. मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांना शनिवारी (ता. 22) तालुक्‍याच्या ठिकाणी अखेरचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर ईव्हीएम व मतदान साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news grampanchyat election