मागण्या मान्य झाल्याने  ग्रामसेवक संघटनेचे आंदोलन मागे 

प्रशांत बैरागी 
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

नामपूर, ( नाशिक ) गेल्या चोवीस दिवसांपासून वेतनश्रेणी, प्रवासभत्ता, नविन पदाची निर्मिती आदीसह प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील ग्रामसेवक बेमुदत संपावर होते. गावपातळीवर प्रशासकीय कामे खोलंबल्याने  गावगाडा ठप्प झाला होता. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (पालवे) व प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थीतीत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डिएनई १३६)च्या पदाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे ग्रामसेवक संघटनेने हे आंदोलन स्थगित केले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे मानद राज्याध्यक्ष कैलास वाकचौरे, जिल्हा उपाध्यक्ष के बी इंगळे यांनी दिली. 
    
   या बैठकीत ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदे रदद्  करून पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण करण्यास  तत्वतः मान्यता देण्यात आली. ग्रामसेवक संवर्गास प्रवासभत्ता १५०० रूपये देण्याबाबत फाईल वित्त विभागकडुन कैबीनेट करीता पाठवण्यात आली असून लवकरच आदेश काढण्याचे आश्वासन दिले. तसेच ग्रामसेवकांची शैक्षणीक अहर्ता पदवीधर करून त्वरीत आदेश काढण्यात येईल. ४ जानेवारी २०१७ चे  अनियमीतता बाबत फौजदारी गुन्हा दाखल करणेचा बदल करण्यात येणार सदरची फाईल तात्काळ निकाली काढण्यात येईल. अतीरिक्त कामे कमी करणे विषयावर सविस्तर चर्चा झाली. 
                  ग्रामसेवक संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे,  ऊर्जामंत्री चंदशेखर बावणकुळे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमाते मंजूर केला. बैठकीला राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे, कोषाध्यक्ष संजिव निकम,  कार्याध्यक्ष गळगुंडे, मानद राज्य अध्यक्ष कैलास वाकचौरे, जिल्हा उपाध्यक्ष के बी इंगळे, अनिल कुंभार , उपाध्यक्ष सुचित घरत , संयुक्त सचिव सचिन वाटकर , प्रसिद्धी प्रमुख बापु अहीरे , संपर्क प्रमुख उदय शेळके विभागीय सचिव कमलेश बिसेन, विभागीय अध्यक्ष अमोल घोळवे, नारायण बडे,  शिवराम मोरे, नागपूर जिल्हाध्यक्ष सुभाष धारपूरे, नांदेड अध्यक्ष एन.डी.कदम , परभणी अध्यक्ष भोसले आदी उपस्थीत होते. राज्यातील सर्व ग्रामसेवकांनी पंचायत समितीतुन चाव्या घेऊन आप आपल्या ग्रापंचायतीत हजर व्हावे, असे आवाहन ग्रामसेवक संघटनेने केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news gramsevak andolan