द्राक्ष शेतकऱ्यांना उर्वरित अंश तपासणीचा अहवाल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

नाशिकः द्राक्षांच्या निर्यातीसाठी आवश्‍यक असलेला उर्वरित अंश तपासणीचा अहवाल पूर्वी निर्यातदार व्यापाऱ्यांना दिला जायचा; पण तो शेतकऱ्यांना मिळत नव्हता. हा अहवाल शेतकऱ्यांना मिळावा म्हणून खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा केला. अखेर कृषी व प्रक्रिया अन्नपदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) तपासणी अहवाल मोबाईलवरून शेतकऱ्यांना पाठविण्याचा निर्णय घेतला. 

युरोपमध्ये द्राक्षाला अधिक भाव मिळत असल्याने युरोपमध्ये द्राक्षे जावीत, यासाठी शेतकरी आग्रही असतात. त्यासाठी द्राक्षांमधील रासायनिक औषधांचा उर्वरित अंश नियंत्रित असावा लागतो. मात्र प्रयोगशाळा प्रशासन तपासणीचा अहवाल शेतकऱ्यांना न पाठविता निर्यातदार व्यापाऱ्यांना पाठवत होते. त्यामुळे व्यापारी सांगेल ते उर्वरित अंशाचे प्रमाण शेतकऱ्यांना मान्य करावे लागायचे. द्राक्षांमध्ये उर्वरित अंश अधिक असल्याने तुमची द्राक्षे युरोपऐवजी इतर देशात पाठवावी लागतील, अशी सबब सांगून व्यापारी द्राक्षांचे भाव कमी करतात. त्यास कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी मागील आठवड्यात श्री. गोडसे यांची भेट घेऊन उर्वरित अंशाचा अहवाल मिळावा, अशी मागणी केली होती. 

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणाऱ्या फसवणुकीची दखल घेत श्री. गोडसे यांनी शेतकऱ्यांच्या समक्ष दिल्लीतील केंद्रीय वाणिज्य प्रशासनाशी संपर्क साधला. त्या वेळी सरकारच्या अधिकृत प्रयोगशाळेकडून व्यापाऱ्यांप्रमाणे शेतकऱ्यांना तपासणीचा अहवाल पाठवण्याविषयीचे महत्त्व त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. चार दिवसांपूर्वी गोडसे यांनी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. केंद्र सरकारने दखल घेत यापुढे तपासणीच्या अहवालाची प्रत शेतकऱ्यांना पाठविण्याचे मान्य केले आहे. तसे लेखीपत्र बुधवारी "अपेडा'कडून श्री. गोडसे यांना प्राप्त झाले. 

Web Title: marathi news graps farmer