धोंडगव्हाणला पारा शुण्याच्या आत ; दवबिंदुचे बर्फ़ात रूपांतर 

सुभाष पुरकर
शनिवार, 29 डिसेंबर 2018

वडनेर भैरव  जिल्ह्यात थंडीचा कहर भलताच वाढला आहे नाशिक जिल्ह्यातील धोंडगव्हान येथे पारा शून्य अंशच्या आत गेला होता दवबिंदुचे बर्फ तयार झाल्याने द्राक्ष व् मक्याचे पाने सकाळी 9 नंतरच्या उन्हामुळे करपली आहे.

वडनेर भैरव  जिल्ह्यात थंडीचा कहर भलताच वाढला आहे नाशिक जिल्ह्यातील धोंडगव्हान येथे पारा शून्य अंशच्या आत गेला होता दवबिंदुचे बर्फ तयार झाल्याने द्राक्ष व् मक्याचे पाने सकाळी 9 नंतरच्या उन्हामुळे करपली आहे.

हवामान विभागाच्या सांगण्यानुसार कश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव वाढला आहे आणि पुढील काही दिवस हा थंडीचा प्रकोप असाच राहील असे सांगितले जात आहे  तर ३१ डिसेंबरचा नवर्षाचा जल्लोष हि अशात वातावरणात साजरा करण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितले आहे. महाराष्ट्रात पडलेल्या थंडीने सर्व चित्रच बदलले असून शेतातील नगदी पीके संकटात सापडण्याची चीन्हे आहे,याच प्रमाणे ग्रामीण भागात  ठीक ठिकाणी थंडी शमवण्यासाठी लोकांनी शेकोटीचा आधार घेतला आहे.

धोंडगव्हान ता चांदवड येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी रामनाथ बस्ते आज ता 29 रोजी पहाटे तापमान पाहण्यासाठी गेले असता त्यांना पारा शुन्य अंशच्या आत पहायला मिळाला,त्यांनी द्राक्ष व् मका पिकाची पाहणी केलि असता पानांवर पडलेल्या दवाचे रूपांतर बर्फ़ात झाल्याचे पहायला मिळाले इतके नीचांकि तापमान व् बर्फ पाहण्याची ही पहिलिच वेळ आहे. पिकांना अन्नसाठा तयार करण्यासाठी पाने महत्वाचे काम करतात मात्र हे पाने करपल्याने पिकाची रोग प्रतिकारक शक्ति कमी होऊन होऊन उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे श्री बस्ते यांनी सांगितले आहे.

रोजच्या सवयीप्रमाणे पहाटे तापमान पाहिले असता तापमान शून्य झाल्याचे दिसले गाड्यांवर द्राक्ष,मका पिकांची पाने पहिली असता त्यावर बर्फ पडलेला दिसून आला सकाळी 8 नंतर पडलेल्या उन्हाच्या चटक्याने पिकांचे पाने करपली आहे 
रामनाथ बस्ते द्राक्ष उत्पादक,धोंडगव्हान

Web Title: marathi news graps problem