काझीगढीचे राहीवासी रामभरोसे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

जुने नाशिकः पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आ. देवयांनी फरांदे, महापालिका आणि जिल्हा प्रशसानांच्या अधिकाऱ्याकडून धोकादायक काझीगढीची ऑगस्ट महिन्यात झालेल्या जोरदार पावसात पाहणी केली होती. त्यावेळी पंधरा दिवसात गढीचा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या सुचना अधिकाऱ्याना दिल्या होत्या. पण अद्याप गढीबाबत कुठलाही निर्णय झाला नसून रहिवासी रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. 

    काझीगढी ढासळण्याचा प्रकार अनेक वेळा घडला आहे. यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने गढी ढासळण्याचा प्रकार घडला होता. दरवेळेस येथील रहिवास्याना पावसाळ्यात तार्त्पूता स्थळांतरीत केले जाते. दरम्यान येथील घराचा भाग ढासळण्याचे प्रकार घडत असतात. रहिवास्याना जीवमुठीत घेवून रहावे लागते. गेल्या कित्येक वर्षापासून रहिवास्यांकडून येथे संरक्षण भिंत बांधण्याची मागणी होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news GROUND kazi gadi